मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

उंच टाचांच्या चपला न घालताही टाचांमध्ये वेदना का होतात?

उंच टाचांच्या चपला न घालताही टाचांमध्ये वेदना का होतात?

टाचांमध्ये होणाऱ्या वेदनांमागे (heel pain) अनेक कारणं आहेत.

टाचांमध्ये होणाऱ्या वेदनांमागे (heel pain) अनेक कारणं आहेत.

टाचांमध्ये होणाऱ्या वेदनांमागे (heel pain) अनेक कारणं आहेत.

  • myupchar
  • Last Updated :
    टाचेची रचना अशी आहे की शरीराचं वजन ते आरामात पेलतं. चालताना किंवा धावताना टाच पायावरचा दबाव घेतं, ज्यामुळे ती व्यक्ती पुढे जाण्यास सक्षम होते. टाच दुखणं ही आता एक सामान्य समस्या बनली आहे. बर्‍याच घटनांमध्ये टाच दुखणं तीव्र आणि असह्य असतं. टाचात इतक्या वेदना होतात की दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय देखील आणू शकतात. काही प्रकरणांमध्ये वेदना बर्‍याच काळासाठी टिकून राहतात. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. के एम नाधीरयांनी सांगतिलं, सामान्यत: टाच किंवा त्याच्या मागे वेदना होत असते. दुखापत, मुरगळ, फ्रॅक्चर इत्यादीमुळे टाच दुखते. शिवाय सांधेदुखी, टेंडिनिटिस, बर्साइटिस, फायब्रोमायल्जिया, गाउट, टाच स्पर्स, प्लांटार फॅसिआइटिस इत्यादीमुळेदेखील टाचांचा समस्या उद्भवतात. टाचाच्या वेदनांमध्ये टाचात सुन्नपणा, मुंग्या येणं किंवा ताप येणं अशी लक्षणंही दिसू लागतात. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टाच दुखत असेल, टाचेजवळ सूज येत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. टाचांमध्ये वेदना होत असताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळी टाचेला पुरेशी विश्रांती द्या, आरामदायक पादत्राणं घाला, जास्त उभे राहू नका, कडक जमिनीवर अनवाणी पाय ठेवू नका, उंच टाचांचे बूट घालणे टाळा. याशिवाय काही घरगुती उपचारही प्रभावी ठरू शकतात. हे वाचा - झोप येत नसेल तर करा भ्रामरी प्राणायाम;10 मिनिटांच्या योगाभ्यासाने मिळेल हा फायदा myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, टेंडिनिटिस, प्लांटार फास्टायटीस आणि हाडांच्या उत्तेजनामुळे टाचांमध्ये होणाऱ्या वेदनांना बर्फ लावल्यास आराम मिळतो. बर्फाचा वापर केल्यानं प्रभावित क्षेत्र सुन्न होतं, वेदना कमी होतात आणि सूज येते. ऑलिव्ह, नारळ, तीळ किंवा मोहरीच्या तेलानं बाधित भागाची मालिश केल्यास आराम मिळतो. हे वाचा - 'निगेटिव्ह सेल्फ टॉक' मानसिक आरोग्यासाठी धोकादायक; यातून कसं मुक्त व्हाल टाचांचा त्रास टाळण्यासाठी काही उपाय करणं चांगलं ठरेल. टाचांचा त्रास टाळण्यासाठी त्यांच्यावरील दबाव कमी करणं आवश्यक आहे. खेळादरम्यान दर्जेदार शूज घालण्याची काळजी घ्या. शूज/ बूट पायाचा आकाराच्या योग्य असावं आणि त्यात पायांना आरामदायक वाटलं पाहिजे. जास्त वजन असलेली व्यक्ती चालताना किंवा चालत असताना टाचांवर जास्त दबाव आणतो. अशामध्ये एखाद्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - टाचा दुखणे: लक्षणे, कारणे, उपचार... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health, Pain

    पुढील बातम्या