मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कांदा-लसूण खाल्ल्यानंतर चार-चौघात तोंड उघडण्याची होते पंचाईत? दुर्गंधी घालवण्याचे हे आहेत उपाय

कांदा-लसूण खाल्ल्यानंतर चार-चौघात तोंड उघडण्याची होते पंचाईत? दुर्गंधी घालवण्याचे हे आहेत उपाय

ऑफिसमध्ये असो किंवा कुठेही बाहेर गेल्यानंतर कोणाशी बोलायचे झाल्यास कांदा खाल्ल्याचे समोरच्याला समजते आणि आपल्याला लाजिरवाणे वाटते. श्वासाच्या दुर्गंधीची समस्या तुम्हालाही त्रास देत असेल, तर या काही सोप्या टिप्स तुमच्या उपयोगी येतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 जानेवारी : कच्चा कांदा किंवा लसूण खाल्ल्याने (eating onion-garlic) तोंडाला दुर्गंधी (bad breath) येते. ही समस्या बहुतेक लोकांना त्रास देते आणि कुठेतरी बाहेर जाताना आपल्याला लाज वाटते. ऑफिसमध्ये असो किंवा कुठेही बाहेर गेल्यानंतर कोणाशी बोलायचे झाल्यास कांदा खाल्ल्याचे समोरच्याला समजते आणि आपल्याला लाजिरवाणे वाटते. श्वासाच्या दुर्गंधीची समस्या तुम्हालाही त्रास देत असेल, तर या काही सोप्या टिप्स (Bad Breath Problem) वापरून तुम्ही परिणाम पाहू शकता.

कोमट पाणी प्या

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, कांदा आणि लसणाचा वास ताबडतोब दूर करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे कोमट पाणी पिणे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने फक्त पचनच चांगले होत नाही तर तोंडात असलेले बॅक्टेरिया आणि विषारी घटक देखील बाहेर पडतात.

लिंबू-पाणी

जेवणानंतर लिंबू-पाणी प्यायल्यानेही तुम्हाला फायदा होईल. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक अॅसिड आणि अँटीबॅक्टेरियल घटक कांदा आणि लसूणचा वास नाहीसा करून श्वास ताजा ठेवतात. यासाठी थोडे कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा. या पाण्याने चुळा भरल्यास अधिक परिणाम दिसेल.

बडीशेप आणि वेलची

बडीशेप आणि वेलची खाल्ल्याने पचनास मदत होते. यासोबतच या गोष्टी तोंडाची दुर्गंधीही दूर करतात. या दोन्ही गोष्टी कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

दूध

दूध प्रभावीपणे कांदा किंवा लसूणचा तीव्र वास कमी शकते. परंतु, कांदा-लसुण असलेले अन्न खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. कांदा-लसूण खाल्ल्यानंतर किमान 20 मिनिटांनी दूध प्या. दूध जड असते आणि ते पचायला वेळ लागतो. अन्न खाणे आणि दूध पिणे यामध्ये अंतर असल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

हे वाचा  - या सरकारी योजनेद्वारे तुम्हीही बनू शकता लखपती, कमी पैशात होईल डबल फायदा

सफरचंद

जेवणानंतर सफरचंद खाणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सफरचंदातील एन्झाईम्स कांदा-लसूणमधील सल्फर कंपाऊंड नष्ट करू शकतात, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होते. यामुळे तुमचे दात निरोगी राहतील. तुम्ही सफरचंदाचा रस देखील पिऊ शकता.

पुदीना पाने

पुदिन्याची पाने खाल्ल्यानेही फायदा होईल. यामुळे कांदा आणि लसणाचा वास दूर होईल.

हे वाचा - Exercise In Evening: सकाळी-सकाळी नव्हे संध्याकाळी करा व्यायाम; सगळे फायदे वाचून तुम्हीही नियोजन बदलाल

ग्रीन टी

ग्रीन टी हे हर्बल पेय मानले जाते. अन्न खाल्ल्यानंतर ग्रीन टीचे सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. यामुळे पचनक्रियाही सुधारेल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Onion