मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सतत गरम पाणी प्यायलात तर होऊ शकतात ‘हे’ परिणाम

सतत गरम पाणी प्यायलात तर होऊ शकतात ‘हे’ परिणाम

शरीरात पाण्याचं प्रमाण 55-65 टक्के असतं हे अनेक अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. यामुळे शरीरातून टॉक्सिन्सही बाहेर पडतात. मात्र गरम पाणी जास्त प्रमाणात प्यायलं तर बरोबर याउलट होऊ शकतं.

शरीरात पाण्याचं प्रमाण 55-65 टक्के असतं हे अनेक अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. यामुळे शरीरातून टॉक्सिन्सही बाहेर पडतात. मात्र गरम पाणी जास्त प्रमाणात प्यायलं तर बरोबर याउलट होऊ शकतं.

शरीरात पाण्याचं प्रमाण 55-65 टक्के असतं हे अनेक अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. यामुळे शरीरातून टॉक्सिन्सही बाहेर पडतात. मात्र गरम पाणी जास्त प्रमाणात प्यायलं तर बरोबर याउलट होऊ शकतं.

पुढे वाचा ...

    मुंबई, 7 डिसेंबर : आपल्यापैकी अनेकांना गरम पाणी (Hot Water) प्यायची सवय असते. त्यात थंडीमध्ये (Cold) तर गरम पाणी प्यायलानं आणखी बरं वाटतं. सर्दी, घसा दुखणं किंवा खोकल्यासाठी डॉक्टरही अनेकदा गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. आता तर कोरोनाच्या भीतीने अनेकजण सतत गरम पाणी पित असतात. गरम पाणी पिणं चांगलं असलं तरी सतत गरम पाणी पिण्यानं त्रासही होऊ शकतो. याबद्दलचं वृत्त 'टीव्ही 9' नं दिलं आहे.

    सतत आणि प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी प्यायलं तर काय त्रास होऊ शकतो हे जाणून घेऊया.

    किडनीवर प्रेशर (Pressure On Kidney)

    आपल्या किडनी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकण्याचं काम करतात. सतत गरम पाणी पिण्यामुळे डिहायड्रेशन होतं. त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. किडनीवरचा भार वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम शरीराच्या अन्य भागांवरही पडतो. त्यामुळे सततत किंवा जास्त गरम पाणी प्यायलं तर त्याचा किडनीवर परिणाम होतो.

    हेही वाचा : हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, पुरुषांना होईल जबरदस्त फायदा

    डिहायड्रेशन- (Dehydration)

    शरीरात पाण्याचं प्रमाण 55-65 टक्के असतं हे अनेक अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. यामुळे शरीरातून टॉक्सिन्सही बाहेर पडतात. मात्र गरम पाणी जास्त प्रमाणात प्यायलं तर बरोबर याउलट होऊ शकतं. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी प्यायलानं डिहायड्रेशन होऊ शकतं. गरम पाणी जास्त प्यायलानं तोंड येतं, तोंडात फोड येऊ शकतात. तसंच तोंडात जळजळ होऊ शकते. अर्थातच त्याचा शरीरातील अंतर्भागांवर परिणाम होतो. सगळ्यांत जास्त परिणाम अन्न प्रक्रिया आणि पचनावर होतो. गरम पाण्याचं तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा जास्त असतं. याचा समतोल साधण्यात शरीर असमर्थ असतं.

    झोपेवरही परिणाम (Effect on Sleep)

    गरम पाणी जास्त प्यायलानं झोपेवरही परिणाम होऊ शकतो असं काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. रात्री झोपण्याच्या आधी गरम पाणी पिण्याची सवय असेल तर त्यामुळे झोपेची तक्रार निर्माण होऊ शकते. रात्री गरम पाणी प्यायलानं रक्त वाहिनीवरच्या कोशिकांवरचा दाब वाढू शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी जास्त गरम पाणी पिऊ नका.

    हेही वाचा : तुम्हीही Toilet मध्ये Smartphone घेवून जाता का? मग याचे गंभीर परिणाम एकदा वाचाच

    हिवाळ्यात सर्दी, खोकला होऊ नये म्हणून गरम पाणी पिणं स्वाभाविक असतं. त्यातच आता कोरोनाच्या भीतीमुळे लोकांचं गरम पाणी पिणंही वाढलं आहे. कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली की त्याचा त्रासच होतो. तसंच गरम पाण्याचंही आहे. गरम पाणी प्रमाणात आणि कधी प्यायचं हे लक्षात ठेवून प्यायलात तर शरीराला त्याचा फायदा होईल. मात्र प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी प्यायलं गेलं तर त्यानं शरीरावर विपरीत परिणाम होतील हे नक्की.

    First published:
    top videos