Home /News /lifestyle /

SOCIAL MEDIA नको रे बाबा! सेलिब्रिटी का घेतायेत सोशल मीडियापासून दुरावा

SOCIAL MEDIA नको रे बाबा! सेलिब्रिटी का घेतायेत सोशल मीडियापासून दुरावा

सोशल मीडिया (Social media) हे विरोधाभासानं भरलेलं कोडं आहे.

नवी दिल्ली, 18 मार्च :  सध्या प्रत्येक जण सोशल मीडियावर (Social Media) आहे. सेलिब्रिटींसाठी तर हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि लोकांशी संपर्कात राहण्याचं उत्तम असा मार्ग आहे. पण तरीदेखील बहुतेक सेलिब्रिटी सोशल मीडिया सोडताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेता आमिर खाननेदेखील (Aamir khan) सोशल मीडियाला रामराम ठोकला. आमिरशिवाय याआधी बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडिया सोडलं आहे. या वर्षी जानेवारीत क्रिकेटपटू ऋषभ पंत याने सोशल मीडिया सोडलं. बॉलिवूड स्टार (Bollywood Star) राणी मुखर्जी, रणवीर कपूर, सैफ अली खान, रेखा, तसंच हॉलिवूड स्टार (Hollywood Star) जेनिफर अॅनिस्टन, अॅजेंलिना जोली, जेनिफर लॉरेन्स, सांड्रा बुलक, एमिली ब्लंट, केट विन्सलेट यासारखे सेलिब्रिटी सोशल मीडियापासून दूर गेले आहेत. यामागे नेमकं कारण काय? मानसिक रोग संशोधक आणि मानसिक उपचार तज्ज्ञांच्या मते, सोशल मिडीयामुळे आपल्या शारिरीक (Physical) आणि मानसिक आरोग्यावर (Psychological Health) कुठेतरी परिणाम होतो. जेव्हा तुम्ही तुमचं सोशल मीडिया अकाऊंट बघता, त्यानंतर दिवसभर तुम्ही काळजीत किंवा चिंताग्रस्त राहता. तसंच सोशल मीडियावरील काही गोष्टी दिवसभर तुमच्या मनात सातत्यानं घोळत राहतात, या गोष्टींचा तुम्ही कधी विचार केलाय का? कोणत्याही व्यक्तीची पोस्ट, तुमची पोस्ट, कमेंट, कॉम्पलिमेंट किंवा व्हिडीओ तुम्हाला अस्वस्थ करतो किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टींचा तुमच्यावर नकळत परिणाम होतो. अनेकदा सर्व कामे सोडून केवळ विचार करत बसता आणि त्यानंतर इतके उदास होता की शरीर आणि मन तुमची साथ सोडून देतं. आपण आजारी पडलो की काय असं वाटून तुम्ही कोणतंही काम करू शकत नाही. मग तुम्ही एकदा विचार करता की चला काही दिवस सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करूया. कारण यामुळे काहीच फरक पडत नाही. जगात यापेक्षा अनेक गोष्टी आहेत. आपण नाहक या गोष्टीत पडलो, असं तुम्हाला वाटतं. हे सर्व केवळ तुमच्याच बाबतीत घडतं असं नाही तर अनेक सेलिब्रिटींना देखील असंच जाणवतं. हे वाचा - सुंदर दिसण्याच्या नादात सडलं नाक; टीव्ही स्टारला कॉस्मेटिक सर्जरी पडली महागात सोशल मीडिया हे विरोधाभासानं भरलेलं कोडं आहे. यातून आनंद मिळण्याबरोबरच कधी कधी तणाव देखील मिळू शकतो. यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. परंतु, यामुळे वेगळेपणा आणि अपूर्णतेची भावना उद्भवू शकते. महत्त्वाची गोष्टी म्हणजे यावर होणारे ट्रोलिंग तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. जे लोक सोशल मीडियावर जास्त वेळ असतात, त्यांना सोशल मीडियाशिवाय जीवन थोडं कठीण वाटू शकते. परंतु, सोशल मीडियाचा ब्रेक घेण्यासाठी अनेक कारणं असू शकतात. उत्पादकतेत होते घट सातत्याने सोशल मीडियावरील नोटीफिकेशन आल्याने आपलं लक्ष विचलित होतं. यामुळे तुमच्या प्रोडक्टीव्हिटीवर (Productivity) म्हणजेच उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या (American Psychological Association) म्हणण्यानुसार, एका वेळी अनेक कामं करण्याच्या प्रयत्नामुळे आपल्या उत्पादकतेवर परिणाम होतो. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असताना मध्येच आपण फेसबुकसारखे सोशल मीडीया अकाऊंट चेक करतो. यामुळे आपली उत्पादकता 40 टक्क्यांनी घटते. जेव्हा आपण सोशल मीडियापासून दुरावतो, तेव्ही ही उत्पादकता वेगाने वाढते. कॉन्कर सायबर ओव्हरलोडच्या लेखिका आणि विस्कोसीन मेडिसीन युनिव्हर्सिटीच्या निवृत्त प्राध्यापक जोआने कॅंटर म्हणतात, की सोशल मीडियाबाबत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे यामुळे आपण विस्कळीत होऊन जातो. सर्जनशीलतेवरही होतो परिणाम रचनात्मक कामांवर होणाऱ्या वाईट परिणामामुळे कदाचित सेलिब्रेटीज सोशल मीडियापासून दूर जाताना दिसतात. कोणतेही काम सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावर व्यस्त असणं ही बाब रचनात्मकतेवर परिणाम करते. त्यामुळे सोशल मीडिया पूर्णपणे सोडून आपण धोकादायक माहितीपासून स्वतःला मुक्त करावं आणि सर्जनशीलता (Creativity) वाढू द्यावी. तणावामध्ये वाढ कधीही आणि कुठेही सोशल मीडियाचा वापर करणं आता सोपं झालं आहे. आपलं लक्ष सातत्याने न्यूजफिड आणि टाईमलाईनवर असतं. यावर प्रा. ग्रीनफिल्ड म्हणतात की, सातत्यानं आनलाईन काय सुरू आहे हे जाणून घेताना आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचा स्त्राव वाढतो, परिणामी तणावात (Stress) वाढ होते. यामुळे आपल्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. सोशल मीडिया सोडणं सुरुवातीला जातं कठीण सोशल मीडिया सोडण्याचे परिणाम दीर्घकालीन सकारात्मक असतात, पण झटकन सोशल मीडिया सोडल्याने तुम्ही तणाव किंवा चिंताग्रस्ततेचे शिकार होऊ शकता. सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे आत्मविश्वास कमी असणं, झोपेत व्यत्यय येणं, संबंधांमध्ये तणाव निर्माण होणं, जीवनाचा कंटाळा येणं, निर्णय घेताना अडचणी येणं, भावनात्मक बुद्धीमत्ता आणि समजूतदारपणाचा अभाव आदी समस्या निर्माण होतात. मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात? नोएडा येथील मॅक्स हॉस्पिटलचे कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट डॉ. पुनीत माथूर म्हणतात, सोशल मीडिया सोडणं किंवा त्यापासून दूर राहणं हा निर्णय प्रत्येकाचा व्यक्तिगत असू शकतो. मनःशांतीसाठी काही लोक सोशल मीडिया काही काळापुरतं किंवा कायमचं सोडतात. हे वाचा - या गोंडस फोटोमागे दडलाय ड्रामा क्वीनचा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला? सर गंगाराम हॉस्पिटलच्या कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट डॉ.आरती आनंद म्हणतात, ट्रोलिंग हे सोशल मीडियापासून दूर जाण्याचं एक कारण असू शकतं. कारण ट्रोलिंगमुळं लोकांना असहाय्य होतात. ते मानसिकदृष्ट्या बेचैन होतात. काही पोस्ट किंवा व्हिडीओमुळे लोकं नकारात्मकतेचेही शिकार होतात.
First published:

Tags: Health, Lifestyle, Social media

पुढील बातम्या