मुलींनो, हिवाळ्यात असा बनवा तुमचा Wardrobe, नक्कीच दिसाल कूल आणि फॅशनेबल!

मुलींनो, हिवाळ्यात असा बनवा तुमचा Wardrobe, नक्कीच दिसाल कूल आणि फॅशनेबल!

प्रत्येक ऋतूची गरज आणि परिस्थिती यांचा अंदाज घेऊन आपण फॅशन केली पाहिजे. हिवाळ्यातील फॅशनचे हे काही अनोखे पर्याय.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी: हिवाळा (winter) असला म्हणून काय झालं? फॅशनेबल (fashionable) तर प्रत्येक ऋतूत राहायला हवं. जाणून घ्या हिवाळ्यात वॉर्डरोबमध्ये मस्ट असणारे काही ड्रेसेस(dresses).

विशेष काय, हिवाळ्यातच तुम्ही अनेक स्टाईलचे (winter fashion) वेस्टर्न ड्रेसेस (western wear) ट्राय करू शकता. कोट, जॅकेट्स (winter jackets) आणि अजून काय काय प्रयोग तुम्ही लुकसोबत करू शकता.

हार्डनेक पुलओव्हर

हार्डनेक पुलओव्हर हा हिवाळ्यातला एक मस्त पर्याय आहे. तुम्ही याला जीन्स किंवा वूलन पॅन्टव्यतिरिक्त लॉंग स्कर्टसोबतही मॅच करू शकता. हिवाळ्यात तुम्ही काळ्या पुलओव्हरसह रंगीबेरंगी पुलओव्हरही तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा.

नी लेंथ कोट

तुम्ही क्लासी फॅशनच्या चाहत्या असाल, तर नी लेंथ कोट हा तुमच्यासाठी आवश्यक पर्याय आहे. तुम्ही कुठल्याही ड्रेसवर याला ट्राय करू शकता. कुठल्याही प्रसंगी हा पर्याय मस्त सूट होईल असा आहे. क्लासी शूज आणि बूट यांच्यासोबत हे कॉम्बिनेशन खास दिसेल. सोबतच इंडियन ड्रेससोबतपण या पर्यायासह तुम्ही आकर्षक दिसू शकता.

कार्डिगन

कार्डिगनला अधिकतर महिला आऊटडेटेड मानतात. पण याला योग्य प्रकारे अंगावर घालाल तर कमालीचा ग्लॅमरस (glamorous) लूक येतो. याला श्रगसारखंही वापरू शकता.

वन पीस ड्रेस

तुम्ही वन पीसच्या शौकीन असाल, तर त्यासाठी हिवाळा एकदम मस्त मोसम आहे. हा वन पीस ब्लॅक स्टॉकिंग्ज आणि लॉन्ग बुटांसह खास दिसतो.

लॉन्ग श्रग

लॉन्ग श्रग तुम्हाला वेधक लूक देईल यात काहीच शंका नाही. याला कुठल्याही ड्रेससह घालाल तर क्लासी दिसाल. हिवाळ्यात नीलेन्थ श्र, फुल लेन्थ श्रग, काळे आणि रंगीबेरंगी असे अनेकप्रकारचे श्रग आहेत. पेन्सिल ड्रेस घालण्यात संकोच वाटत असेल तर तो तुम्ही विंटर लॉन्ग श्रगसोबत घालू शकता.

Published by: News18 Desk
First published: January 16, 2021, 4:20 PM IST

ताज्या बातम्या