मुंबई, 18 जानेवारी : शरीराच्या सौंदर्यातला मुख्य भाग म्हणजे चेहरा (face). चेहऱ्याला आकर्षक बनवताना त्याच्यावरच्या सर्वच फीचर्सचा विचार करणं गरजेचं आहे. ओठ (lips) त्यापैकीच एक महत्त्वाचा भाग. ओठ पातळ असतील तर अनेकदा आकर्षक दिसत नाहीत. अशावेळी काही सोप्या टिप्स (tips) वापरून त्यांना प्रमाणबद्ध आणि आकर्षक बनवता येऊ शकते. यातून तुमचं सौंदर्य आणखी खुलून येईल.
लिप लायनर (lip liner)
लिप लायनर वापरून हे करता येईल. त्यासाठी न्यूड किंवा न्यूड गुलाबी शेडचं लीप लायनर तुमच्या ओठांसाठी वापरा. या लीप लायनरनं ओठांना आऊटलाईन द्या. ओठ भरून दिसतील.
हायलायटिंग (highlighting)
ओठांच्या हायलायटिंगसाठी वरच्या लिप्सची आऊटलाईन आणि क्युपिड बो यांच्यावर हलकासा उभार द्या. यातून नक्कीच फरक जाणवेल.
लीप कन्सीलर
लिपस्टिक (lipstick) लावण्याआधी कन्सीलरला वरच्या बाजूला ओठांच्या मध्ये लावा. मग त्याला बाहेरच्या कडांकडे चोळा.
बोल्ड (bold) आणि ग्लॉसी लिपस्टिक
ओठ भरलेले आणि प्रमाणबद्ध दिसण्यासाठी ग्लॉसी किंवा बोल्ड-ब्राईट लिपस्टिक लावा. पातळ ओठांवर डार्क लिपस्टिक लावू नका. मात्र बोल्ड शेड लावताना लीप लायनर तुमच्या लिपस्टिकपेक्षा कमी डार्क (Dark) असेल हे पहा. मग नॅच्युरल (natural) लीप लाईनवर ओठांची आऊटर लाईन ट्रेस करा. ही लाईन सॉफ्ट करण्यासाठी कडांना हळुवार शेड द्या.
आता नीटपणे ओठांवर लिपस्टिक लावा. यासाठी ब्रशचा वापर करा. आता बघा आरशात, तुमचा लुक झाला असेल एकदम मोहक आणि मनासारखा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Tips