क्या बात है! ट्रेनमध्ये फक्त 100 रुपयांत मसाज करून मिळणार; Western Railway चा नवा उपक्रम

क्या बात है! ट्रेनमध्ये फक्त 100 रुपयांत मसाज करून मिळणार; Western Railway चा नवा उपक्रम

इंदूर येथून सुटणाऱ्या 39 गाड्यांमध्ये उपलब्ध राहणार ही सुविधा

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जून : धावत्या गाडीमध्ये रेल्वे प्रवाशांना 100 रुपयात मसाज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही सुविधा इंदूर येथून सुटणाऱ्या 39 गाड्यांमध्ये उपलब्ध राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

''भारतीय रेल्वेच्या इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी ही सुविधा धावत्या गाडीमध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सुविधेमुळे रेल्वेच्या महसुलात तर भर पडेलच याशिवाय प्रवाशांची संख्या देखील वाढेल'', असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी

सेवा प्रदातांच्या माध्यमातून सद्या 20,000 तिकिटांची विक्री केली जाते आणि त्या माध्यमातून वर्षाकाठी रेल्वेला 20 लाख रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त होतो. त्यात 90 लाख रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अशा प्रकारचं कंत्राट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं रेल्वे बोर्डाच्या मीडिया आणि कम्युनिकेशनचे संचालक राजेश वाजपेई यांनी सांगितलं. प्रवाशांसाठी ही सुविधा फक्त 100 रुपयात उपलब्ध राहणार असून, त्यात फूट मसाज आणि हेड मसाजचा लाभ प्रवाशांना घेता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

महसूल वाढीसाठी आणि प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वेच्या विविध विभागातून नाविन्यपूर्ण कल्पना मागविल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांसाठी मसाज सुविधा हा भारतीय रेल्वेचाच एक उपक्रम असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 05:29 PM IST

ताज्या बातम्या