जाल्यान गावली सोन्याची मासोली; आजीबाई एका दिवसात झाली लखपती

जाल्यान गावली सोन्याची मासोली; आजीबाई एका दिवसात झाली लखपती

फक्त एका माशाने (Fish) गरीब महिलेचं नशीबच बदलून टाकलं.

  • Share this:

कोलकाता, 01 ऑक्टोबर : 'भगवान जब भी देता है छप्पर फाडकर देता है', असं म्हणतात ना! ते काही जणांच्या बाबतीत खरंच ठरतं आणि  याचा खरा प्रत्यय आला आहे तो पश्चिम बंगालमधील (west bengal) आजीबाईंना. त्यांच्या जाळ्यात जणू सोन्याचा मासाच (fish) अडकला आणि एका क्षणात त्या लखपती झाल्या आहेत. एका माशाने त्यांचं नशीबच बदलून टाकलं आहे. गरीबीतून त्या लगेच श्रीमंत झाल्या आहेत.

चकपुतडुबी गावात सागरी किनाऱ्याजवळ राहणाऱ्या पुष्पा. मंगळवारी त्यांनी समुद्रातून मासे पकडले. त्यांनी टाकलेल्या जाळ्यात एक असा मासा अडकला ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. भोला प्रजातीचा हा मासा आहे. पुष्पा यांनी पकडलेल्या या माशाचं वजन 52 किलो आहे.

पुष्पा यांनी सांगितलं, "मंगळवारी मी मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले. मला भलामोठा मासा सापडला. इतका मोठा मासा मी कधीच पाहिला नव्हता. याला बंगाली भोला मासा म्हटलं जातं"

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार माशाचा आकार खूप मोठा आहे आणि किंमतही जास्त आहे. हा मासा पकडून गावापर्यंत आणण्यासाठी या महिलेला सर्वांनी मदत केली.

हे वाचा - हा चहावाला नेमकं वापरतो तरी काय? टपरीवर विकतोय 1000 रुपयाला एक कप चहा

पुष्पा यांनी हा मासा बाजारात विकण्यासाठी नेला. हा मासा विकून त्यांना शंभर, हजार रुपये नाही तर लाखो रुपये मिळालेत. तब्बल 3 लाख रुपयांना हा मासा विकला गेला.

पुष्पा म्हणाल्या, "माझ्या पूर्ण आयुष्यात इतका पैसा मी कधीच पाहिला नाही.  6,200 रुपये प्रति किलोने मी हा मासा विकला आणि मला 3 लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई मी केली आहे"

हे वाचा - 3 मित्रांनी 4 वर्षात प्रसिद्ध केला कॉफी ब्रँड, आहे कोट्यवधींची कमाई

जर हा मासा मृत नसता तर त्याची किंमत आणखी जास्त मिळाली असतील, असं एका ग्रामस्थाने सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: October 1, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या