मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रगरगत्या उन्हातही हिरवंगार राहतं हे झाड; तब्बल 3000 वर्षे राहतं टवटवीत

रगरगत्या उन्हातही हिरवंगार राहतं हे झाड; तब्बल 3000 वर्षे राहतं टवटवीत

वेलविश्चिया (Welwitschia) ही जगातील सर्वाधिक जास्त जगणारी वनस्पती असल्याचा दावा केला जातो आहे.

वेलविश्चिया (Welwitschia) ही जगातील सर्वाधिक जास्त जगणारी वनस्पती असल्याचा दावा केला जातो आहे.

वेलविश्चिया (Welwitschia) ही जगातील सर्वाधिक जास्त जगणारी वनस्पती असल्याचा दावा केला जातो आहे.

  मुंबई, 04 ऑगस्ट : कठीण परिस्थितीला तोंड देऊन अधिक कणखर व्हायला होतं असं म्हटलं जातं. याचं उत्तम उदाहरण ठरेल अशी एक वनस्पती (Tree) म्हणजे वेलविश्चिया (Welwitschia). या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे रगरगत्या उन्हात हे झाड टिकाव ठरतं, हिरवंगार राहतं, तब्बल 3000 हजार वर्षे जगतं. म्हणजे इतकी वर्षे ते मृत होत नाही.

  प्रत्येक सजीवाचं जीवनमान ठरलेलं असतं. त्यापेक्षा जास्त काळ सजीव तग धरून राहू शकत नाही. वेलविश्चिया या वनस्पतीला मात्र विशेष वरदान प्राप्त झाल्यासारखी स्थिती आहे. दक्षिण अंगोला (South Angola) आणि नामिबिया (Namibia) या देशांमध्ये आढळणारं हे झाडं (Long living tree). वाळवंटी प्रदेशातली ही वनस्पती  प्रतिकूल हवामानातही तब्बल 3000 वर्षांपर्यंत जीवित राहू शकते. वेलविश्चिया ही पृथ्वीवरच्या सध्या ज्ञात असलेल्या वनस्पतींपैकी सर्वांत दीर्घायुषी असलेली वनस्पती आहे. त्यापेक्षा अधिक काळ जिवंत राहणारी वनस्पती अद्याप आढळलेली नाही.

  हे वाचा - बॅक्टेरियांमुळे दीर्घायुष्य; शतक गाठणाऱ्या व्यक्तींच्या आतड्यात असतात हे जीवाणू

  20 लाख वर्षांपूर्वी या वनस्पतीच्या पेशीविभाजनाची (Cell Division) प्रक्रिया सुरू असतानाच हवामान अत्यंत प्रतिकूल बनलं. त्या दुष्काळी वातावरणामुळे (Drought) त्या वनस्पतीच्या जनुकीय रचनेवर (Genetic Structure) इतका परिणाम झाला, की जणू तिला अमरत्वच प्राप्त झालं म्हणा ना. त्या वेळच्या दुष्काळी वातावरणामुळे तग धरून राहण्याची क्षमता वेलविश्चिया या वनस्पतीत निर्माण झाली असावी, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

  न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 1859 साली वनस्पती आनुवंशशास्त्रज्ञ फ्रेडरिक वेलविच यांनी सर्वांत दीर्घायुषी असलेल्या वनस्पतींवर संशोधन करायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांच्या नावावरून या वनस्पतीला वेलविश्चिया असं नाव देण्यात आलं.

  हे वाचा - पाण्याचं झालं सोनं! Alchemy च्या वैज्ञानिकांना यश

  लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधले वनस्पती आनुवंशशास्त्रज्ञ (Plant Geneticist) जगातल्या सर्वांत दीर्घायुषी वनस्पतींचा शोध घेणाऱ्या अभ्यासात सहभागी झाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, वेलविश्चिया ही अशी वनस्पती आहे, की तिची वाढ कायमच होत राहते. तिची जनुकीय रचना यासाठी कारणीभूत असून, ती जनुकीय रचना विकसित होण्यासाठी तीव्र दुष्काळी, उष्ण वातावरणाचा हातभार लागला आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं. अति उष्ण, दुष्काळी वातावरणासारख्या प्रतिकूल परिस्थितीत तग धरणाऱ्या उपयुक्त पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी वेलविश्चिया वनस्पतीच्या अभ्यासातून मार्ग मिळू शकेल, असा विश्वासही शास्त्रज्ञांना वाटतो आहे.

  हे वाचा - डासांनीच काढणार मलेरियाचा काटा; मादी डासांना नपुसंक बनवून होणार आजाराचा खात्मा

  माणसांची एक पिढी 100 वर्षांची म्हटली, तर या वनस्पतीच्या आयुष्यकाळात माणसाच्या 30 पिढ्या होऊन जातील. आहे की नाही निसर्गाची कमाल!

  First published:

  Tags: Lifestyle, Tree