मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

इथे उंदरांऐवजी माणसंच राहतात बिळात; पाहा जगात कुठे आहे हे ठिकाण

इथे उंदरांऐवजी माणसंच राहतात बिळात; पाहा जगात कुठे आहे हे ठिकाण

उंदरांना बिळात राहताना पाहिलं असेल मात्र, माणसांना बिळात राहताना पाहिलं का? एका गावात लोक बिळात (Mouse Burrow) राहतात. या गावाला 700 वर्षांचा इतिहास आहे.

उंदरांना बिळात राहताना पाहिलं असेल मात्र, माणसांना बिळात राहताना पाहिलं का? एका गावात लोक बिळात (Mouse Burrow) राहतात. या गावाला 700 वर्षांचा इतिहास आहे.

उंदरांना बिळात राहताना पाहिलं असेल मात्र, माणसांना बिळात राहताना पाहिलं का? एका गावात लोक बिळात (Mouse Burrow) राहतात. या गावाला 700 वर्षांचा इतिहास आहे.

    नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : उंदीर (Moues) बिळात राहतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून घरात किंवा बाहेर फिरणारे उंदीर अचानकपणे आपल्या बिळात जाताना आपण पाहिलेले असतात. तेव्हा, बिळात शिरणार्‍या उंदरांना पाहून एवढ्या छोट्याशा बिळात ते कसे काय राहतात असा विचार आपल्या सगळ्यांच्याच मनात येऊन गेला आहे. पण, जगात अशी काही विचित्र ठिकाण (Strange Place) आहेत ज्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांबद्दल जगात (World) चर्चा होत असते. बर्फाळ ठिकाणी राहणाऱ्या लोकांची घरं वेगळ्या पद्धतीची असतात. जास्त पाउस होणाऱ्या प्रदेशात (Areas with high Rainfall)त्यापासून बचावासाठी घरं बांधली जातात. तशीच वाळवंटात (Desert) राहणाऱ्या लोकांची घर असतात. पण, जगातल्या एका देशात चक्क लोक बिळात राहतात. लांबून पाहिल तर, या ठिकाणची घरं ग्रह उंदराच्या बिळा (Mouse Burrow) सारखीच दिसतात. इराण मधल्या एका गावांमध्ये अशाच प्रकारची घर आहे. इराणमध्ये कंदोवन नावाचं एक गाव (Village Kandovan, Iran) आहे, ज्या ठिकाणी लोकांच्या घरातऐवजी वेगळ्या प्रकाची बिळं दिसतात. (लॉटरीच! फक्त 86 रुपयात इटलीत मिळणार स्वत:चं घर; पाहा कसं खरेदी करायचं) का आहे कंदोवन वेगळं? जगातली अनेक शहर त्यांच्या विशेषतेसाठी प्रसिद्ध असतात. काही शहर निसर्गरम्य वातावरणासाठी तर, काही ठिकाणं तिथल्या उष्णतेमुळे किंवा थंड वातावरणामुळे प्रसिद्ध झालेली असतात. काही ठिकाणांमध्ये अशा काही विचित्र परंपरा असतात की, ज्यांच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटतं. कंदोवन गाव सुद्धा असंच एक वेगळं गाव आहे. या ठिकाणचे लोक उंदराच्या बिळा सारख्या दिसणाऱ्या घरांमध्ये राहतात. लोक अशा घरांमध्ये का राहतात याची चर्चा सगळीकडेच होते. (अंडं खाऊन फेकू नका कवच; लांबसडक केसांसाठी तयार करा हेयर मास्क) ही घर दिसायला विचित्र दिसतात मात्र, राहण्यासाठी आरामदायक असतात. एका रिपोर्टनुसार हे गाव 700 वर्षे जुनं आहे. तिथल्या लोकांना या घरांमुळे कधीच हिटर किंवा एसीची गरज पडत नाही. कारण, ही अशी घरं उन्हाळ्यात थंड राहतात आणि थंडी मध्ये गर्मी देतात. (बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर सर्वात प्रभावी; अँटिबायोटिक औषधांपेक्षाही आईचं दूध भारी) गावाचा इतिहास इतिहासानुसार इराणी लोकांनी हे गाव मंगोल आक्रमणापासून बचावासाठी वसवलं. सुरुवातीच्या काळात इथे मंगोल जमातीचे हल्ले व्हायचे त्यावेळी लोक या ठिकाणी आश्रय घेत. मंगोलांच्या भीतीमुळे इथल्या लोकांनी ज्वालामुखीपासून तयार झालेला दगडांमध्ये आपली घर खोदायला सुरूवात केली आणि त्याच ठिकाणी वास्तव्य केलं. या कारणामुळेच हे गाव प्रसिद्ध झालंय.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, World news

    पुढील बातम्या