Skin care ची ही नवी थेरपी पाहून पडाल 'चाट'

Skin care ची ही नवी थेरपी पाहून पडाल 'चाट'

सुंदर दिसण्यासाठी लोक काय काय करतील याचा नेम नाही. आता ही नवी थेरपी अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. स्वतःलाच थोबाडित मारून घ्यायची ही नवी ट्रीटमेंट उपयुक्त आहे असं तज्ज्ञ सांगत आहेत.

  • Share this:

मुंबई, 30जुलै : नितळ, सुंदर त्वचेसाठी अनेक प्रकारच्या Skin care tips तुम्ही ऐकल्या असतील. टोमॅटो, काकडी, अंड्यासारख्या खायच्या पदार्थांपासून माती, चिखल आणि बरंच काही चेहऱ्याला लावून त्वचा नितळ करण्याच्या निरनिराळ्या पद्धती अस्तित्वात आहेत. कित्येक तास ब्युटी पार्लरमध्ये बसून स्किन ट्रीटमेंट घेतली जाते. पण सध्या काही देशांमध्ये एक नवीनच थेरपी आली आहे. या थेरपीला म्हणतात Slap Therapy. चक्क थोबाडित मारण्याची ही ट्रीटमेंट आहे. स्वतःच्याच तोंडात मारून घ्यायची ही पद्धत आहे.

अमेरिका आणि कोरिया या देशांमध्ये सध्या स्लॅप थेरपी बरीच लोकप्रिय होत आहे. स्वतःच स्वतःच्या गालावर थप्पड मारून घ्यायची अशी ही तशी सोपी थेरपी आहे. या अशा सौंदर्योपचाराचा खरंच फायदा होतो का? याबद्दल सौंदर्य तज्ज्ञांचं मत आहे की,'स्लॅप थेरपीमागे विज्ञान आहे. जेव्हा आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या तोंडावर हलक्या हाताने थपडा मारतो त्या वेळी चेहऱ्याच्या त्वचेखालच्या रक्तवाहिन्या उद्दिपित होतात. ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळे त्वचेला तकाकी येते, त्वचा उजळ दिसते. एक प्रकारचे हा चेहऱ्याचा व्यायाम आहे'.

(ऑनलाइन खाणं ऑर्डर करताना सावधान! सॉफ्टवेअर इंजिनिअरचे 2.28 लाख झाले गायब)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, थप्पड मारताना चेहऱ्याच्या त्वचेतल्या कोलेजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्वचेला चकाकी येते. स्लॅप थेरपीचा परिणाम वाढवण्यासाठी जोरात थप्पड मारू नका, नाहीतर चेहराच खराब व्हायचा! असंही तज्ज्ञ सांगतात. हाच स्लॅप थेरपीचा परिणाम ब्युटी पार्लरमध्ये चेहऱ्याला मसाज करतात तेव्हा मिळतो.

(डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतायत, मग करा 'हे' घरगुती उपाय)

हातावर मॉइश्चरायझर घेऊन ते हळूहळू बोटांनी चेहऱ्यावर सगळीकडे गोलाकार पद्धतीने चोळायचं. बराच वेळ असा मसाज केल्यामुळेही ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर लकाकी येते. तेव्हा पार्लरमधला खर्चिक मसाज करायचा की घरच्या घरी स्वतःच स्लॅप थेरपी करायची हे तुम्ही ठरवायचं... चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ही किंमत तर चुकवावीच लागणार!

------------------------------------------------------------------------------

आज कुछ तुफानी करते है! शिवेंद्रराजेंचं चित्तथरारक जिप्सी ड्रायव्हिंग, VIDEO VIRAL

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 30, 2019, 7:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading