Home /News /lifestyle /

Oral Device to Control Weight: त्वरित वजन कमी करण्यासाठी 'हे' डिव्हाइस ठरेल फायद्याचे

Oral Device to Control Weight: त्वरित वजन कमी करण्यासाठी 'हे' डिव्हाइस ठरेल फायद्याचे

न्यूझीलंड ( New Zealand ) आणि ब्रिटनच्या ( Britain ) संशोधकांनी मिळून वजन नियंत्रित करण्यासाठी एक डिव्हाइस (Oral Device to Control Weight) तयार केलं आहे.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर: फास्ट फूड, केक आदी खाल्ल्यानंतर वजन ( gain weight ) वाढतं. त्यानंतर वाढलेलं वजन कमी ( Weight Loss Exercise ) कसं करता येईल, यासाठी विविध उपायांचा शोध घेतला जातो. काहीजण व्यायाम करतात, तर काहीजण आहाराचं नियोजन करतात. तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता त्वरित वजन कमी करण्यासाठी एक डिव्हाइस आलं आहे. ते वापरल्यामुळे तोंड पूर्णपणे उघडत नाही, ज्यामुळे लोकांना फास्ट फूड आणि इतर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाता येत नाहीत. अशावेळी त्यांना द्रव पदार्थांचं सेवन करावं लागतं. त्यामुळे हे डिव्हाइस वजन कमी करण्यात उपयुक्त मानलं जात आहे. थंडीमुळे पायाला भेगा पडल्यात; Cracked heels क्रीम सोडा आता एकदा अननस वापरून पाहा न्यूझीलंड ( New Zealand ) आणि ब्रिटनच्या ( Britain ) संशोधकांनी मिळून वजन नियंत्रित करण्यासाठी एक डिव्हाइस (Oral Device to Control Weight) तयार केलं आहे. ते केवळ वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करत नाही, तर तुमच्या खाण्याच्या सवयीदेखील सुधारण्यास मदत करतं. लठ्ठपणा दूर करण्यासाठी हे डिव्हाइस एखाद्या व्यक्तीला इतकं टॉर्चर करेल की तो स्वतः एखादा पदार्थ खाण्याबद्दल विचार सुद्धा करणार नाही. कसं आहे हे डिव्हाइस ? 'डेंटलस्लिम डाएट कंट्रोल’ (DentalSlim Diet Control) असं या डिव्हाइसला नाव देण्यात आलं आहे. डेंटिस्टच्या मदतीने ते दातांमध्ये बसवलं जातं. हे एक मॅग्नेटिक कॉन्ट्रॅप्शन आहे, जे दातात अडकलेलं असतं. यामुळे,एखादी व्यक्ती 2 मिमीपेक्षा जास्त जबडा उघडू शकत नाही. त्यामुळे एवढ्या छोट्या जागेतून फक्त द्रव पदार्थच पोटात जाऊ शकतात त्यामुळे व्यक्ती एखादा घन पदार्थ खाऊ शकणार नाही. हे डिव्हाइस पूर्णपणे सुरक्षित आहे, आणि आवश्यक असेल तेव्हा ते सहज काढता येतं. आतापर्यंत, हे डिव्हाइस लावल्यानंतर लोकांनी 2 आठवड्यांत 6.3 किलो वजन कमी केलं आहे. दररोज आल्याचा चहा पिऊन कंटाळा आलाय; मग हिवाळ्यात नक्की ट्राय करा चहाचे हे प्रकार सणासुदीच्या काळात उपयोगी 1980 च्या दशकात वापरल्या जाणाऱ्या एका प्रॅक्टिसचा अभ्यास केल्यानंतर हे डिव्हाइस तयार करण्याची कल्पना संशोधकांना सुचली. त्यावेळी लोकांचा जबडा तारेने बांधला जात होता. परंतु यामुळे लोकांमध्ये हिरड्यांचे आजार उद्भवत होते. मात्र, संशोधकांनी आता तयार केलेलं डिव्हाइस लोकांना काढून ठेवता येतं. 2-3 आठवडे ते बसवल्यानंतर काढून टाकता येतं, जेणेकरून संबंधित व्यक्तीचा आहार वाढवला जाऊ शकतो, आणि ती व्यक्ती सामान्य दिनचर्येमध्ये परत येऊ शकते. सणासुदीच्या काळात वजन नियंत्रण करण्यासाठी हे उपकरण सर्वाधिक फायदेशीर ठरेल.
    First published:

    Tags: Weight loss, Weight loss tips

    पुढील बातम्या