मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग 'हे' पदार्थ चुकूनही एकत्र खाऊ नका

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग 'हे' पदार्थ चुकूनही एकत्र खाऊ नका

असंख्य पोषणतज्ञ आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, काही अन्न पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजे कारण यामुळे पचन वाहिन्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोर तुमच्या शरीराला वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये शोषून घेण्यासदेखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.

असंख्य पोषणतज्ञ आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, काही अन्न पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजे कारण यामुळे पचन वाहिन्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोर तुमच्या शरीराला वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये शोषून घेण्यासदेखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.

असंख्य पोषणतज्ञ आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, काही अन्न पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजे कारण यामुळे पचन वाहिन्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोर तुमच्या शरीराला वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये शोषून घेण्यासदेखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 जून : हल्ली अनेक जण वजन कमी करण्यासाठी (Weight Loss Tips) खूप कठोर परिश्रम घेत असतात. व्यायाम करणे, योग्य आहार घेणे. य सर्व गोष्टी लोक करतात मात्र तरीही काहीवेळा आपले वजन कमी होत नाही. अशावेळी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. आपण घेत असलेल्या आहारांपैकी काही पदार्थ असे असतात. जे आपण एकत्र खाणे टाळले पाहिजे. कारण तुमचे वजन कमी होण्यासाठी तुमचा आहार खूप महत्वाची भूमिका बजावतो. असंख्य पोषणतज्ञ आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, असे काही अन्न पदार्थ एकत्र (Unhealthy Food Combination) खाल्यास ते तुमच्या पचन वाहिन्यांना अडथळा निर्माण करू शकतात. त्याचबरोर तुमच्या शरीराला वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये शोषून घेण्यासदेखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, हे काही हानिकारक हे काही अन्न पदार्थ आहेत. जे तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असताना एकत्र खाणे टाळावे.

- जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन (Carbohydrate And Protein Combination) एकत्र घेता. जसे की मांस बटाट्यांबरोबर किंवा ब्रेडसोबत खाणे. यामुळे कार्बोहायड्रेट आंबते आणि मग सूज येणे, आम्लता आणि पोट फुगणे या समस्या निर्माण होतात. याऐवजी बीन्स आणि तांदूळ यांसारखे पूरक अन्न पदार्थ एकत्र खाण्याचा सल्ला दिला जातो.

Aloe Vera oil: केस राहतील हेल्दी आणि शायनी; घरच्या-घरी असं बनवा केमिकल फ्री एलोवेरा ऑइल

- चहासोबत आपल्याला अनेक प्रकारचे स्नॅक्स (Tea And Snacks Combination) खाण्याची आवड असते. मात्र हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात अडसर ठरू शकते. चहामध्ये कॅफिन असते, जे इतर खाद्यपदार्थांसोबत सेवन केल्यावर लोह शोषण्यास अडथळा आणू शकते. ज्यामुळे सूज येते.

- चपाती, भाज्या आणि भात हे क्लासिक भारतीय दुपारचे किंवा रात्रीचे जेवण असते. मात्र चपाती आणि तांदूळ (Wheat And Rice Combination) हे दोन प्रकारचे वजनदार धान्य आहेत, ज्यांचे गलयसेमिक इंडेक्स जास्त आहे. यांचे कधीही एकाच वेळी सेवन करू नये.

- भरगच्च जेवणाने तुमचे पोट आधीच भरलेले असते. त्यामुळे लगेच साखरयुक्त मिष्टान्न खाऊन (Lunch And Sweet Combination) त्यावर जास्त दबाव आणू नका. आपल्या लंच आणि गोड पदार्थ खाण्यादरम्यानच्या वेळेत थोडी वाढ करा.

- आरोग्य तज्ञांच्या मते, विविध पचन एंझाइम्ससह अन्न एकत्र केल्याने तुमच्या आतड्यांवर हानिकारक परिणाम होतील. वेगवेगळी पचन गती आवश्यक असलेले अन्न देखील एकत्र खाणे टाळावे. यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि तुमची वजन कमी करण्याची योजना विस्कळीत होऊ शकते.

Hand Washing: हॅडवॉश करताना 90 टक्के मुलं या चुका करतात; आजारी पडण्याचं प्रमाण म्हणून वाढतं

- कार्बोहायड्रेट आणि साखर (Carbohydrate And Sugar Combination) हे आणखी एक घातक मिश्रण आहे. ज्याचे एकत्र सेवन करू नये. उदाहरणार्थ, कोका-कोला सारख्या एरेटेड ड्रिंकसह बटाटा चिप्स घेतल्यास वजन कमी करण्याच्या प्रवासात निश्चितच अडथळा निर्माण करते.

First published:

Tags: Food, Health Tips, Lifestyle, Weight loss