मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गरज नाही व्यायामाची; फक्त या 6 सवयी बदल्याने होईल Weight Loss

गरज नाही व्यायामाची; फक्त या 6 सवयी बदल्याने होईल Weight Loss

वाढलेली चरबी कमी करयाची आहे पण, एक्ससाइज करण्याचा कंटाळा येत असेल तर, किमान हे करता येत का पाहा...

वाढलेली चरबी कमी करयाची आहे पण, एक्ससाइज करण्याचा कंटाळा येत असेल तर, किमान हे करता येत का पाहा...

वाढलेली चरबी कमी करयाची आहे पण, एक्ससाइज करण्याचा कंटाळा येत असेल तर, किमान हे करता येत का पाहा...

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : वजन वाढायला (Weight Gain) लागलं तर, आपलं टेन्शन (Tension) देखील तेवढेच वाढायला लागतं. वजन वाढल्यामुळे अनेक आजार देखील व्हायला लागतात. शिवाय आपले आवडते कपडे  (favorite Dress) देखील आपल्याला घालता येत नाहीत. वाढत्या वजनामुळे टेन्शन आलं की आपण लगेचच डायटिंग (Dieting), एक्सरसाइज (Exercise) सुरू करतो. याशिवाय अनेक पदार्थ आहारामधून काढून टाकतो. मात्र, याने वजन कमी होण्यापेक्षा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम (Side Effect on Health) होत असतो. त्यामुळे वाढलेल्या वजनाचं टेन्शन घेण्यापेक्षा हे 6 बदल करून पाहा.

जास्तीत जास्त सोल्युबल फायबर खा

सोल्युबल फायबर हा पाण्यामध्ये विरघळणारा घटक आहे. ज्यामुळे अन्नपचनाची क्रिया हळुवारपणे व्हायला लागते. त्यामुळे जास्त लवकर भूक लागत नाही आणि आपण ओव्हर इटिंग करत नाही. कमी प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन कमी व्हायला लागतं. सोल्युबल फायबर बेली फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

(दिसताच गळ्यावर सूज करून घ्या टेस्ट; कॅन्सर, थायरॉईडचं असू शकतं लक्षण)

ट्रान्स फॅट फूड टाळा

ट्रान्स फॅट फूड आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्यामुळे वजन झपाट्याने वाढायला लागतं. अशा पदार्थांमध्ये तेल भरपूर प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे चरबी वाढते. वजन कमी करायचं असेल तर. ट्रान्स फॅट खाऊ नयेत.

(धक्कादायक! विचित्र आजाराने ग्रस्त लेकाने रागात तोडली आईची बोटं)

मद्यपान कमी करा

जास्त मद्यपान करण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. मद्यपान करणाऱ्यांच्या शरीरामध्ये चरबी वेगाने वाढायला लागते. यामुळे वजनही झपाट्याने वाढतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर मद्यपान बंद करा.

हाय प्रोटिन डाएट घ्यायला सुरुवात करा

वजन कमी करायचं असेल तर कार्बोहायड्रेड टाळून प्रोटीन जास्त घेण्याचा प्रयत्न करा. प्रोटीन डाएट घेतल्यामुळे भूक कमी होते आणि मेटाबोलिजम रेट वाढतो.

(गर्भावस्थेत एक गोळी करेल घात; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला)

स्ट्रेस कमी करा

जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस घेणाऱ्या लोकांमध्ये देखील वजन वाढण्याची समस्या असते. जास्त चिंता करण्यामुळे अ‍ॅड्रिनल ग्लॅन्ड जास्त प्रमाणात कार्टिसोल करायला लागतात. त्यामुळे भूक वाढते. असे लोक जंक फूड जास्त प्रमाणामध्ये खातात. परिणामी वजन वाढायला लागतं.

(तुम्ही खाता तो भुट्टा देशी मक्याचं कणीस असतं की स्वीट कॉर्न? कोणतं कणीस चांगलं?)

गोड पदार्थ टाळा

साखरेमध्ये फ्रुक्टोज जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे क्रोनिक आजार होण्याची भीती वाढते. गोड खाण्यामुळे हृदयरोग, डायबेटीस, ओबेसिटी असे त्रास होऊ शकतात. गोड पदार्थांमुळे, चरबी वाढायला लागते याशिवाय शक्य असल्यास व्यायामाकडे देखील लक्ष द्या.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight gain, Weight loss