मुंबई, 13 जानेवारी : स्नॅक्स हे तुमच्या पूर्ण जेवणाव्यतिरिक्त दिवसभर लहान भूकेसाठी खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ आहेत, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण या ऐवजी मध्ये मध्ये जे खाल्ले जाते ते म्हणजे स्नॅक्स. स्नॅक्स जेवण म्हणून खाल्ले जात नाही, तर ते लहान भागांमध्ये वाटून खाल्ले जातात. जेवणाच्या दरम्यान स्नॅक्स घेणे देखील खूप महत्वाचे आहे, ते भूक नियंत्रित करून रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत.
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल, तर तुम्ही तुमच्या स्नॅक्समध्ये काही आरोग्यदायी आणि लो कॅलरी असलेल्या पर्यायांचा समावेश करावा. ज्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात आणि वजन कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही हेल्दी आणि लो कॅलरी स्नॅकचे पर्याय घेऊन आलो आहोत, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर तसेच चविष्ट आहेत.
Skipping Breakfast : वजन कमी करण्यासाठी नाश्ता बंद करण्याचा विचार करताय? पाहा काय आहे तज्ज्ञांचं मत
वजन कमी करण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स
मिक्स नट्स : healthline.com नुसार, नट्स हा एक पौष्टिक आणि चवदार नाश्ता आहे, जो हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि फायबर यांचे परिपूर्ण संतुलन आहे. फॅट्स आणि कॅलरी जास्त असूनही, ते वजन कमी करण्यास उपयुक्त आहेत. तुम्ही मिड स्नॅक्ससाठी बदाम, अक्रोड, ब्राझील नट्स, हेझलनट्स, पाइन नट्स आणि पिस्ता यांसारखे इतर नट्सदेखील निवडू शकता.
ग्रीक दही आणि बेरी : ग्रीक दही म्हणजेच ग्रीक योगर्ट आणि बेरी यांचे मिश्रण अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असते. ग्रीक दही प्रोटीन समृद्ध आहे आणि बेरीमध्ये अँटिऑक्सिडेंट आहेत. ज्याचे सेवन केल्याने शरीरालाही अनेक फायदे मिळू शकतात.
डार्क चॉकलेट आणि बदाम : चॉकलेट्समध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे ते खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच एक उत्तम, पोर्टेबल आणि हेल्दी स्नॅक बनतात.
फ्रेश फ्रूट बाऊल : आपल्या सर्वांना माहित आहे की, निरोगी राहण्यासाठी नियमितपणे फळे खाणे खूप महत्वाचे आहे. फळांमध्ये भरपूर फायबर आणि अनेक खनिजे असतात, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. वजन कमी करण्याच्या स्नॅक्समध्ये फळे हा सर्वात आरोग्यदायी आणि चवदार पर्याय आहे.
Side Effects of Cucumber : यावेळी चुकूनही खाऊ नका काकडी, फायद्याऐवजी होईल नुकसान
पॉपकॉर्न : वजन कमी करण्यासाठी, तुम्हाला बटर आणि खारट पॉपकॉर्नऐवजी हेल्दी आणि कमी कॅलरी असलेले एअर-पॉप्ड पॉपकॉर्नचे खावे लागेल. पॉपकॉर्नमध्ये फायबर असते जे पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight, Weight loss tips