मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Weight Loss Tips : नियमित बार्ली ड्रिंक घेतल्याने वजन होते कमी, हाय कोलेस्टेरॉलसाठीही असते फायदेशीर

Weight Loss Tips : नियमित बार्ली ड्रिंक घेतल्याने वजन होते कमी, हाय कोलेस्टेरॉलसाठीही असते फायदेशीर

बार्लीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. न्यूट्रिशनिस्ट कविता देवगणने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी बार्ली वॉटर पिण्याचे फायदे सांगितले आहेत.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 22 ऑगस्ट : बार्लीचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बार्ली हे एक धान्य आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. जरी लोक बार्लीचा जास्त वापर करत नाहीत, परंतु बार्लीचे पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. बार्लीमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर त्यात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट, नियासिन, जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, मॅंगनीज, प्रोटिन्स ऊर्जा, तांबे, जस्त इत्यादी भरपूर प्रमाणात असतात.

न्यूट्रिशनिस्ट आणि 'द इम्युनिटी डाएट'च्या लेखिका कविता देवगणने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी बार्ली वॉटर पिण्याचे फायदे सांगत आहे. यासोबत त्यांनी बार्लीचे पाणी तयार करण्याची पद्धतही सांगितली आहे. चला जाणून घेऊया बार्लीचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.

बार्लीचे पाणी पिण्याचे फायदे

- न्यूट्रिशनिस्ट कविता देवगणने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, बार्लीचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. ते प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. ते चवीलाही खूप छान लागते. यासोबतच पोटाचे आरोग्य, पचनसंस्थाही निरोगी राहते.

- बार्लीचे पाणी प्यायल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात तयार होते. जर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळीही जास्त असेल तर तुम्ही हे आरोग्यदायी पाणी नियमितपणे पिऊ शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रुटीनमध्ये सामील करा या 4 सवयी, हृदयही राहील निरोगी

- अनेकदा महिलांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास होतो. बार्लीचे पाणी प्यायल्यास UTI आणि लघवीच्या समस्या टाळता येतात.

- किडनीच्या आरोग्यासाठीदेखील हे एक अतिशय आरोग्यदायी पेय आहे. बार्लीचे पाणी प्यायल्याने किडनीचा त्रास होत नाही. किडनी आपले काम निरोगी आणि सुरळीतपणे करते. किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

- जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते त्यांच्या आहारात बार्लीचे पाणी समाविष्ट करू शकतात. ते प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Health Tips : दुधी भोपळा आरोग्यदायी असला तरी त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला माहीत आहेत का?

बार्लीचे पाणी कसे तयार करावे

थोडे बार्ली घ्या. एका मोठ्या कप पाण्यात 7-8 मिनिटे उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर ते एका कपमध्ये गाळून त्यात लिंबाचा रस टाकून थंड करा. आता हे डिटॉक्स पाणी हळूहळू चहासारखे प्या.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss tips