मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips : झोपेतच कमी होईल वजन; फक्त रात्री न चुकता जरूर खा हे 4 पदार्थ

Weight Loss Tips : झोपेतच कमी होईल वजन; फक्त रात्री न चुकता जरूर खा हे 4 पदार्थ

अनियमित आणि अनियंत्रीत जिवशैलीमुळे बहुतेक लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या (Weight gain problem) निर्माण झाली आहे. वाढलेले वजन अनेक समस्यांना आमंत्रण देत असते.

अनियमित आणि अनियंत्रीत जिवशैलीमुळे बहुतेक लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या (Weight gain problem) निर्माण झाली आहे. वाढलेले वजन अनेक समस्यांना आमंत्रण देत असते.

अनियमित आणि अनियंत्रीत जिवशैलीमुळे बहुतेक लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या (Weight gain problem) निर्माण झाली आहे. वाढलेले वजन अनेक समस्यांना आमंत्रण देत असते.

मुंबई, 9 जुलै : आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला आपल्या आहाराकडे (Healthy Diet) लक्ष देणे शक्य होत नाही. अनेकदा आपल्याला जेवणाचे टायमिंग देखील ठरलेले नसते. तसेच अनेकदा आपण जंक फूड, तेलकट खाद्यपदार्थ, फास्ट फूड इत्यादी खातो आणि त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. अशा अनियमित आणि अनियंत्रीत जिवशैलीमुळे बहुतेक लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या (Weight gain problem) निर्माण झाली आहे. वाढलेले वजन अनेक समस्यांना आमंत्रण देत असते. वजन वाढल्यानंतर मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल हे आजार मागे लागू शकतात.

एवढेच नाही तर पोट आणि कंबरेभोवती चरबी वाढते आणि त्यामुळे शरीराचा आकार देखील बिघडतो. अशा स्थितीत आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि व्यक्तीला अनेकदा लाजिरवाणे देखील वाटू शकते. त्यामुळे वजन नियंत्रित करणे (How To Burn Belly Fat) अत्यंत महत्त्वाचे असते. वजन कमी करण्याच्या टप्प्यात रात्रीचा आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. रात्री झोपण्यापूर्वी आपण कसा आहार (Night Diet) घेतो आणि कोणते पदार्थ खातो याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असते. आज आपण अशा काही पदार्थांविषयी (Foods for Night) जाणून घेणार आहोत, जे रात्री जेवणापूर्वी खाल्ल्याने तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

रात्री जेवल्यानंतर खा दही

रात्री जेवल्यानंतर दही (Curd) नक्की खावे. दह्यात कॅलरीज आणि भरपूर प्रोटीन्स असतात. त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते. यासोबतच दह्यामध्ये असलेले मायक्रोन्यूट्रिएंट पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात आणि वजनही कमी करतात.

तुमचेही हात-पाय खूप दुखतात? दुर्लक्ष करू नका, गुलियन बॅरे सिंड्रोमचे असू शकते लक्षण

रात्री भूक लागल्यास खा बादाम

काहीवेळा वेगवेगळ्या काराणांमुळे आपल्याला रात्री उशीरा झोपावे लागते आणि अशा वेळी अचानक भूक लागते. अशा परिस्थितीत तुम्ही काही बदाम खाऊ शकता. भूक भागवण्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. बदामामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात आणि कॅलरीजही कमी असतात.

पीनट बटरसह होल ग्रेन ब्रेड

तुम्हाला रात्री उशीरा भूक लागली असेल तर तुम्ही पीनट बटर (Peanut Butter) लावून होल ग्रेन ब्रेडचे (Whole Grain Bread) 2 स्लाइस खाऊ शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते.

रात्री केळी खाऊ शकता

केळी खाल्ल्याने वजन वाढते असे मानले जाते, परंतु त्यात असे अनेक पोषक तत्व आढळतात जे वजन कमी करण्याचे काम करतात. या फळामध्ये असलेल्या फायबरमुळे जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे? असू शकते 'चॉकलेट सिस्ट'चे लक्षण, अशी घ्या काळजी

तज्ञ काय म्हणतात?

झी न्यूज हिंदीच्या बातमीनुसार प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट 'निखिल वत्स' (Nikhil Vats) यांनी सांगितले की, या चार गोष्टींमध्ये आवश्यक पोषक तत्त्वे आढळतात. त्यामुळे थकवा जाणवत नाही. तसेच दह्यातील एन्झाइम्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्याचप्रमाणे रोज मूठभर बदाम न भिजवता खाल्ले तर जास्त फायदा होतो. होल ग्रेन ब्रेड खरेदी करताना त्यातील घटक काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच खरेदी करावे. तसेच केळी हा झटपट उर्जेचा स्त्रोत आहे, ते व्यायाम करण्यापूर्वी खावे.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss