मुंबई, 5 फेब्रुवारी : भोजपुरी अभिनेत्री (Bhojpuri actress rani chatterjee) राणी चॅटर्जी आपल्या फिटनेसला घेऊन खूप सजग असते. तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये व्यायाम (fitness routine) करतानाचे फोटो आपल्याला बघायला मिळतात.
काही दिवसापूर्वी राणी चॅटर्जीने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. त्या फोटोत ती जिममधून बाहेर पडताना दिसते. ती आपल्या फिटनेससाठी घेत असलेली मेहनत त्या फोटोमधून स्पष्टपणे दिसते. आज राणीच्या फिटनेसचे सर्व लोक कौतुक करतात. मात्र एक वेळ अशी होती, की तिच्या त्या जाड असण्यावर लोक टोमणे मारायचे. तिला ट्रोल केलं जायचं.
या सर्वांना कंटाळून जेव्हा राणी चॅटर्जीने सर्वाना खुलेपणा सांगितले, की ती तिचे वजन कमी करून दाखवेल. तेव्हा तिच्यावर सर्व लोक सोशल मीडियावर हसायला लागली होती. त्या सर्व हसण्याला, ट्रोलिंगला (trolling) दुर्लक्षित करून राणीने आपण स्वतःशी केलेल्या चॅलेंजवर (challenge) फोकस करीत काम करण्यास पसंती दिली. व्यग्र दिनचर्येतून वेळ काढत ती नियमित जिमला जात होती. तिने पंधरा किलो वजन कमी करीत व्यायाम, फिटनेसबाबत (fitness) काही टिप्स युट्युबलासुद्धा (you tube) शेअर केल्या.
View this post on Instagram
त्यात ती सांगत होती, 'मला शूटिंगसाठी सकाळी सात वाजता जायला लागणार असेल तर मी पाच वाजता उठते. माझा ठरलेला व्यायाम करते आणि मगच शुटींगसाठी जाते. मी व्यायामाला कधीच सुट्टी देत नाही. जेव्हा माझी कधी फ्लाईट असते तेव्हासुद्धा मी आधीच तिथे पोचून किमान पन्नास वेळा तिथल्या पायरीवर वर-खाली धावत व्यायाम करते. पुढे ती सांगते, की ती कधी तिचं वजन चेक करत नव्हती. आपलं वजन खूप जास्त आहे या भीतीनं ती त्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असे. मात्र तिनं फिट राहायचं असेल तर वजन कमी केलंच पाहिजे असा निश्चय केला आणि त्यावर काम करायला सुरुवात केली.
या अशा काही टिप्स देणार. यातून तुम्हीही फिट अँड स्लिम राहू शकणार.
- असे पदार्थ खा. ज्यातून तुमचे वजन वाढणार नाही. हेल्दी प्रोटीन असलेले अन्न खा.
- डायटिंग करण्याच्या भानगडीत न पडता वेळेत योग्य आहार घ्या. जेवण करताना अधिक कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाण्याचं टाळा. प्रथिनं देणारेच पदार्थ आपल्या आहारात ठेवा.
- खूप पाणी प्या. पण, पाणी पीत असताना जेवण केल्यावर काही वेळेच अंतर राखा. जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.
- एकाच वेळी खूप जास्त जेवण करणं टाळा. जेवण झाल्याबरोबर बसून राहणं किंवा झोपणं टाळा.
- फॅट वाढणारं फूड खाणं टाळा, सॉफ्ट ड्रिंक्स कमीत कमी पिण्याचा प्रयत्न करा.
- हे सर्व करत असताना पुरेशी झोप घ्या. नियमित व्यायाम करण्याचा नियम पाळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Inspiring story, Instagram, Weight loss