Weight Loss Tips- वजन कमी करायचंय तर आता एकट्याने करा जेवण!

Weight Loss Tips- वजन कमी करायचंय तर आता एकट्याने करा जेवण!

वाढतं वजन कमी करण्यासाठी लोक तासन् तास जिममध्ये घाम गाळतात. एवढंच नाही तर योगासनं, डाएट अशा एक ना अनेक गोष्टी करून वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

  • Share this:

वाढतं वजन कमी करण्यासाठी लोक तासन् तास जिममध्ये घाम गाळतात. एवढंच नाही तर योगासनं, डाएट अशा एक ना अनेक गोष्टी करून वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र एका झालेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, वजन कमी करण्यासाठी आता फार मेहनत करण्याची गरज नाही. जर कमनीय बांध्यासाठी तुम्ही कमी जेवत असाल तर त्यासोबत एकट्याने जेवणाचीही सवय लावा. एका नव्या संशोधनात हे समोर आलं आहे की, जेव्हा आपण मित्र- परिवार आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत जेवायला बसतो तेव्हा नेहमीपेक्षा जास्त जेवण जेवलं जातं.

अमेरिकन सोसायटी ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार एकत्र जेवताना व्यक्ती गरजेपेक्षा जास्त जेवतो. तर एकटं असताना तो त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी जेवतो. ब्रिटनमधील बर्मिघम विद्यापीठाचील प्राध्यापक हेलेन रुडॉक म्हणाले की, आम्हाला याबद्दल माहिती मिळाली की, एकट्याने जे जेवतात त्यांच्या तुलनेत जे आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जेवण करतात ते जास्त जेवतात. आधीच्या संशोधनातही हे सिद्ध झालं आहे की, एकटे जेवण्याच्या तुलनेत जे ग्रुपमध्ये जेवतात ते एकूण 48 टक्के जास्त जेवण करतात. लठ्ठपणाने ग्रस्त महिलांनी एकत्र जेवण्यामुळे 29 टक्के जास्त भोजन केलं. याचं मुख्य कारण म्हणजे गप्पांच्या मैफिलीत आपण किती जेवतो हे कळत नसल्यामुळे अनेकदा गरजेपेक्षा जास्त जेवलं जातं. मात्र जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा किती जेवायचं आहे याची पूर्ण जाणीव असते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

दिवसाची सुरुवात या विचारांनी करा, कधीच येणार नाही नैराश्य!

सेल्फीमुळे कळतील तुमची गुपितं, सांभाळून काढा PHOTO!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 02:27 PM IST

ताज्या बातम्या