मुंबई, 2 जानेवारी : वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात. वेगवेगळे व्यायाम करतात, वेगवेगळ्या पद्धतीचे डाएटिंग फॉलो करतात. काहीवेळा तर लोक चक्क सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवणही स्किप करतात. मात्र याने खरंच वजन कमी होते का? तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही रात्रीचे जेवण स्किप करण्याचा विचार करत असाल तर एकदा हे नक्की वाचा.
इंस्टाग्रामवर drsnehal_adsule यांनी याबद्दल विशेष माहिती दिली आहे. वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण वगळले तर यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल, पण ते तात्पुरतेच. मात्र याचा दीर्घकालीन परिणाम होत नाही. बर्याच लोकांना असे वाटते की ते कमी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते. मात्र, असे नाही. प्रत्यक्षात, हा दृष्टीकोन केवळ एक भ्रम होता.
Calorie Deficiency : वेटलॉससाठी तुम्ही लो कॅलरी आहार घेता? वाचा कसे ठरू शकते घातक
याचे आपल्या शरीरावर उलट परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही खूप कमी कॅलरीचे सेवन केले तर तुमचे शरीर उपासमारीच्या स्थितीत जाईल आणि त्यामुळे वजन कमी करण्याऐवजी, तुम्ही असे करत राहिल्यास तुमचे वजन वाढू शकते. रात्रीचे जेवण स्किप केल्यास आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया.
रात्रीचे जेवण न केल्यास शरीरावर होणारा परिणाम
- अन्नाचे पचन हे मुख्य कॅलरी बर्नर आहे. नियमितपणे न खाल्ल्याने शरीराचा चयापचय दर कमी होतो.
- न खाल्ल्याने शरीरावर ताण वाढतो. या धोक्याचा सामना करण्यासाठी तणाव स्टिरॉइड संप्रेरक सोडतो आणि याचा एक दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणे.
- जेवण वगळल्याने जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे तुमच्यापैकी बहुतेक जे जेवण वगळतात ते मग अन्नाऐवजी चुकीचे पर्याय निवडतात.
Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा हे पीठ; आरोग्यसाठीही फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला
अनेकांना असे वाटते की, रात्रीचे जेवण बंद म्हणजे वजन कमी. मात्र तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर यासाठी पहिली पायरी म्हणजे हा गैरसमज सोडणे. वजन कमी करण्यासाठी साधे आणि घरचे जेवण घ्या आणि शक्यतो बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा. रात्रीचे जेवण किंवा इतर कोणतेही जेवण वगळणे हा वजन कमी करण्याचा सुरक्षित पर्याय नाही. कायम लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी योग्य अन्न खा कमी नाही.
View this post on Instagram
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips