मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Weight Loss : अभिनेत्रीने अवघ्या 15 दिवसांत कमी केले वजन, तेही 61व्या वर्षी, चाहते झाले थक्क!

Weight Loss : अभिनेत्रीने अवघ्या 15 दिवसांत कमी केले वजन, तेही 61व्या वर्षी, चाहते झाले थक्क!

जिथे तरुणांना वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, तिथे एका अभिनेत्रीने चक्क वयाच्या 61व्या वर्षी 15 दिवसांत आश्चर्यकारकरित्या वजन कमी केले आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो, पण ते खरं आहे.

जिथे तरुणांना वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, तिथे एका अभिनेत्रीने चक्क वयाच्या 61व्या वर्षी 15 दिवसांत आश्चर्यकारकरित्या वजन कमी केले आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो, पण ते खरं आहे.

जिथे तरुणांना वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, तिथे एका अभिनेत्रीने चक्क वयाच्या 61व्या वर्षी 15 दिवसांत आश्चर्यकारकरित्या वजन कमी केले आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसू शकतो, पण ते खरं आहे.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 21 ऑगस्ट : वजन कमी करणे ही एक खूप वेळखाऊन आणि मेहनती प्रक्रिया आहे. जिथे तरुणांना देखील वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, तिथे एका अभिनेत्रीने चक्क वयाच्या 61व्या वर्षी आश्चर्यकारकरित्या वजन कमी केले आहे. हे पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो आणि तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता. पण हे खरं आहे. पोर्तुगालची टीव्ही अभिनेत्रीने कॅरोल व्हॉर्डमनने (carol vorderman) ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे. कॅरोलचं वय 61 वर्ष आहे आणि तिने अवघ्या 15 दिवसांत आपले वजन कमी केले आहे. याबाबात बोलताना तिने सांगितले की वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिने रेस्टॉरंटमध्ये देखील जेवण केले. कॅरोलची वजन कमी करण्याची प्रक्रिया अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे आम्ही ही माहिती येथे देत आहोत.

कॅरोल वोर्डमनने तिचे वजन कमी करणारे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. काही वर्षांपूर्वी जी शॉर्ट मला येत नव्हती ती देखील आता मी घालू शकते असे तिने म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी फीट होत असल्याने जी शॉर्ट घालणे तीन सोडली होती ती आता तिला व्यवस्थित येत आहे. तिने या शॉर्टसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. कॅरोल व्हॉर्डमनने तिच्या या वजन कमी करण्याचे रहस्य सांगतिले आहे. तिने वजन कमी करण्यासाठी अवलंब केलेला संपूर्ण डाएट प्लान सांगितला आहे.

फोटो शेअर करून दिला धक्का

वजन कमी करण्यासाठी कॅरोल वोर्डमन काही दिवस घरापासून दूर असलेल्या एका कॅम्पमध्ये गेली होती. तिथे शिबिरात वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तेथून परतण्याआधी टीव्ही स्टार कॅरोलने फोटो शेअर केले आणि लिहिले की 'आम्ही लवकरच घरी येत आहोत... अजून फक्त एक दिवस बाकी आहे.' तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यात ती अगदी स्लीम फीट दिसत आहे. कॅम्पमध्ये असताना 18 दिवसांपैकी 3 दिवस तिने रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केले आणि इतर 15 दिवस नेमके काय केले ज्यामुळे तिचे वजन कमी झाले हे देखील तिने सांगितले आहे.

Diabetes Tips : 2 मिनिटात कमी होईल वाढलेली ब्लड शुगर; फक्त रोज जेवण झाल्यानंतर करा हे काम

15 दिवस ज्यूसवर राहिली

कॅरोल वोर्डमनने कॅम्पमध्ये राहून वजन कसे कमी केले याबाबातही माहिती दिली आहे. तिने सांगितिले की, शिबिरात तिला फक्त तीन दिवस रेस्टॉरंटमध्ये जेवण्याची परवानगी होती. पूर्ण 18 दिवसांच्या शिबिरात तिने 3 दिवस रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि उरलेले 15 दिवस ती फक्त ज्यूसवर राहिली. याशिवाय तिने तेथील अनेक उपक्रमातही भाग घेतला. शिबिरात व्यायाम देखील मजेदार पद्धतीने केल्याचे कॅरोलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोका

चाहत्यांकडून होतीय प्रशंसा

कॅरोल वोर्डमनचे चाहते तिच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. पोर्तुगालची ही स्टार अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेहनत घेत आहे. तिने अनेकवेळा आपल्या फोटोंमधून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी वजन कमी करणे तिच्यासाठी खूप रोमांचक अनुभव होता.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss tips