मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Soup For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे दोन सूप आहेत जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Soup For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे दोन सूप आहेत जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Soup For Weight Loss: हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही निवडक सूपचा समावेश केल्यास वजन कमी करण्यात त्यांची खूप मदत होऊ शकते. हे सूप कोणते आहेत आणि ते कसे तयार केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.

Soup For Weight Loss: हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही निवडक सूपचा समावेश केल्यास वजन कमी करण्यात त्यांची खूप मदत होऊ शकते. हे सूप कोणते आहेत आणि ते कसे तयार केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.

Soup For Weight Loss: हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही निवडक सूपचा समावेश केल्यास वजन कमी करण्यात त्यांची खूप मदत होऊ शकते. हे सूप कोणते आहेत आणि ते कसे तयार केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : थंडीच्या दिवसात वजन कमी (Weight loss) करणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. थंडीत पहाटे छान झोप लागते आणि सकाळी उबदार अंथरुणातून बाहेर येण्याचे मन होत नाही. यामुळे अनेकांच्या सकाळच्या व्यायामाचे गणित बिघडते. मात्र, वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. त्यासोबतच काही सूपच्या मदतीनंही आपण वाढलेलं वजन कमी करू शकतो, त्याविषयी (Soup For Weight Loss) जाणून घेऊया.

हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही निवडक सूपचा समावेश केल्यास वजन कमी करण्यात त्यांची खूप मदत होऊ शकते. हे सूप कोणते आहेत आणि ते कसे तयार केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.

Soup For Weight Loss In Winter- फुलकोबीचे सूप

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी तुम्ही फुलकोबीच्या सूपची (Cauliflower soup) मदत घेऊ शकता. फुलकोबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. या भाजीमध्ये भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. फ्लॉवर सूप बनवण्यासाठी दोन कप चिरलेली फुलकोबी घ्या. नंतर कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात एक चमचा चिरलेले आले व लसूण टाका. यानंतर एक चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिटे शिजवा.

कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यात चिरलेली फुलकोबी घाला आणि दोन ग्लास पाणीही घाला. यानंतर चवीनुसार मीठ आणि दोन चिमूटभर काळी मिरी घालून पॅन झाकून ठेवा. यानंतर सूप सुमारे दहा मिनिटे शिजू द्या. नंतर गॅस बंद करा आणि सूप थंड होऊ द्या आणि नंतर ब्लेंडरच्या मदतीने भाज्या मॅश करा, गाळून घ्या आणि प्या.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

पालकचे सूप

पालक सूप वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आजकाल पालक बाजारात सहज उपलब्ध आहे. पालकमध्ये फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या अनेक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. तसेच, यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि हे सूप प्यायल्याने शरीरही उबदार राहते.

हे वाचा - Winter Health: थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय? या 5 फळांचा आहारात करा समावेश

पालक सूप बनवण्यासाठी पालक धुवून चिरून घ्या. नंतर एक पॅन घ्या आणि त्यात एक छोटा चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात दोन चिमूटभर जिरे आणि एक चमचा चिरलेला लसूण घाला. यानंतर त्यात एक कप चिरलेला कांदाही टाका. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात दोन वाट्या चिरलेला पालक घाला आणि एक मोठा ग्लास पाणी घालून पॅन झाकून ठेवा. दोन मिनिटांनंतर पालकात चवीनुसार मीठ आणि दोन चिमूटभर काळी मिरी घाला. तुम्‍हाला हवं असल्‍यास तुम्‍ही चव वाढवण्यासाठी एक छोटासा टोमॅटो देखील घालू शकता. हे मिश्रण दहा मिनिटे शिजू द्या. नंतर गॅस बंद करून पालक चांगले मॅश करून गाळून घ्या आणि गरम सूप प्या.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips