मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चक्क 94 किलो वजन केलं कमी; आयुष्यात घडलेल्या एका धक्क्यामुळे तरुणी जिद्दीला पेटली

चक्क 94 किलो वजन केलं कमी; आयुष्यात घडलेल्या एका धक्क्यामुळे तरुणी जिद्दीला पेटली

काही लोक आहेत, जे स्वत:ला प्रोत्साहित करतात आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी, आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी नियमित मेहनत घेतात. या मेहनतीला नंतर यशही मिळतं. असंच काहीसं झालंय, जॉर्जियामध्ये राहणाऱ्या लॉरा कॅल्बर्टसोबत...

काही लोक आहेत, जे स्वत:ला प्रोत्साहित करतात आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी, आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी नियमित मेहनत घेतात. या मेहनतीला नंतर यशही मिळतं. असंच काहीसं झालंय, जॉर्जियामध्ये राहणाऱ्या लॉरा कॅल्बर्टसोबत...

काही लोक आहेत, जे स्वत:ला प्रोत्साहित करतात आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी, आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी नियमित मेहनत घेतात. या मेहनतीला नंतर यशही मिळतं. असंच काहीसं झालंय, जॉर्जियामध्ये राहणाऱ्या लॉरा कॅल्बर्टसोबत...

  • Published by:  Karishma Bhurke

जॉर्जिया, 28 नोव्हेंबर : जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांना ओबेसिटी अर्थात लठ्ठपणाची गंभीर समस्या आहे. पण लठ्ठपणाची समस्या असलेल्यांपैकी काहीच लोक आहेत, जे लठ्ठपणा कमी करण्यासाठी जबरदस्त मेहनत घेतात. अनेकांना आपण बारीक व्हाव, असं आतून वाटत असतं, पण त्यासाठी लागणारी मेहनत, व्यायाम आणि इतर काही गोष्टी करण्यासाठी वेळ नसल्याची कारणं देतात. परंतु असे काही लोक आहेत, जे स्वत:ला प्रोत्साहित करतात आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी, आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी नियमित मेहनत घेतात. या मेहनतीला नंतर यशही मिळतं. जॉर्जियामध्ये राहणाऱ्या लॉरा कॅल्बर्टसोबत असंच काहीसं झालंय.

कमी वयातच डिप्रेशन -

लॉराने तिच्या कठिण मेहनतीने केवळ स्वत:चं वजनचं कमी केलं नाही, तर ती आता एक हेल्थ ट्रेनरही आहे. लॉरा दुसऱ्यांना वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहित करते. लॉराचं वजन 184 किलो होतं, परंतु तिने जिद्दीने, चिकाटीने तीन वर्षात तब्बल 94 किलो वजन कमी केलं आहे.

लॉराने तिचं वजन आधीपासूनच खूप असल्याचं सांगितलं. हाय-स्कूलला पोहचेपर्यंत तिचं वजन जवळपास 90 किलो झालं होतं. कोणताही पुरुष माझा मित्र होण्यास तयार होत नसे. माझ्या वडिलांसोबतही माझे चांगले संबंध नव्हते, असं एका मुलाखतीदरम्यान लॉराने सांगितलं.

लॉरा 30 वर्षांची होईपर्यंत डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला दारुचं व्यसन लागलं होतं. अधिक प्रमाणात फास्ट फूडचंही ती सेवन करत होती.

(वाचा - वजन कमी करायचं? या पद्धतीने आहारात करा भारतीय अन्नपदार्थांचा समावेश)

26व्या वर्षी हार्ट अटॅक -

लॉरा 26 वर्षांची असताना तिला हार्ट अटॅक आला. अटॅकची तीव्रता कमी होती, त्यामुळे अधिक समस्या आली नाही. डिप्रेशनमध्ये असल्याने तिला रुग्णालयात जायचं नव्हतं. तिला अनेकदा आपल्या आयुष्यात कोणतंचं ध्येय नाही, आपण मरावं असं वाटायचं. तिला जबरदस्तीने डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला अटॅकची तीव्रता कमी असल्याचं सांगत, वजन कमी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही लॉराने आपल्या आयुष्यात कोणतेही बदल केले नाहीत आणि केवळ 30व्या वर्षात तिला डायबिटीज, हाय ब्लड प्रेशन आणि हाय कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण झाली.

184 किलो वजनाच्या लॉराने कमी केलं 94 किलो वजन -

काही वर्षांनंतर, 2016 मध्ये लॉरा एका दुकानात गेली होती, त्यावेळी त्या दुकानात एका छोट्या मुलीने लॉराकडे इशारा करत आपल्या वडिलांना, ती पाहा किती जाडी आहे, असं म्हटलं होतं. या घटनेनंतर लॉराला अतिशय वाईट वाटलं आणि त्याचवेळी तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

Laura Calbert

लॉराने त्यानंतर एक ऑनलाईन वेट लॉस प्रोग्राम जॉईन केला आणि वर्कआउट सुरू केलं. वेट लॉस प्रोग्राम जॉईन केल्याच्या वर्षभरानंतरही ती स्वत:ला प्रोत्साहित करू शकत नव्हती. परंतु हळू-हळू तिने स्वत:ला, मनाला या गोष्टींची सवय करून दिली. 184 किलो असलेल्या लॉराने कठिण मेहनतीनंतर, तीन वर्षांत तब्बल 94 किलो वजन कमी केलं. आज लॉरा अनेक महिलांची प्रेरणा ठरली आहे.

First published:

Tags: Weight loss