• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • वजन वाढू नये म्हणून तुम्हीही भात खात नाहीत का? मग हे वाचाच

वजन वाढू नये म्हणून तुम्हीही भात खात नाहीत का? मग हे वाचाच

भात खाणं पूर्णपणे बंद केल्याने गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

  • Share this:
मुंबई, 23 ऑक्टोबर : वाढतं वजन (Weight gain), लठ्ठपणा (Obesity) या समस्येचा आज अनेक जण सामना करत आहेत. या समस्येमागे चुकीचा आहार, अवेळी खाणं, पुरेशा व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, तसंच अन्य आजार आदी कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी जिम (Gym), डाएट (Diet) आणि औषधांसारखे अनेक उपाय केले जातात. भात (Rice) खाल्ल्यानं वजन वाढतं असं ऐकून किंवा कुठे तरी वाचून अनेक जण दैनंदिन आहारात भात वर्ज्य करतात (Rice cause weight gain), मात्र हे पूर्णतः चुकीचं आहे. आपल्या आहारातला प्रत्येक पदार्थ शरीरासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे भात न खाणं योग्य नाही. तुम्ही भात खाणं पूर्णपणे बंद केलं तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो (Benefits of rice). भातामुळे लठ्ठपणा वाढतो, त्यामुळे त्याचा आहारात समावेश नसावा असा चुकीचा समज लोकांमध्ये पाहायला मिळतो. सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी भाताविषयीचे गैरसमज दूर करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवरून (Instagram) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाताची उपयुक्तता त्यांनी सांगितली आहे. भात न खाल्ल्यानं शरीर अनेक पोषक घटकांपासून वंचित राहतं. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. भातात अनेक पोषक तत्त्वं असतात. भात हा एक प्रोबायोटिक (Probiotic) असतो. भातामुळे केवळ पोट भरतं असं नाही, तर पोटातले उपयुक्त बॅक्टेरियादेखील वाढतात. हे वाचा - सकाळचा भात संध्याकाळी खात असाल तर आधी हे वाचा; शिळ्या भाताचे दुष्परिणाम माहीत नसतील भात खाणं त्वचेसाठी फायदेशीर असतं. यातील प्रोलॅक्टिनमुळे शरीरावरच्या छिद्रांपासून मुक्तता मिळते. भात खाल्ल्यानं केसांचं (Hair) आरोग्य चांगलं राहतं आणि त्यांची वाढही चांगली होते. डाळ, दही, कढी, शेंगा, तूप आणि मांसासोबत भाताचं सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहते. तसंच हे पदार्थ सहज पचतात आणि पोट हलकं राहतं. भाताचं सेवन केल्यानं झोप चांगली लागते. हॉर्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं. डाळ, भाज्यांसोबत भात खाणं श्रेयस्कर असतं. तसंच तांदूळ दळून त्याची खीर खाणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं. तांदळाचा प्रत्येक घटक वापरण्यायोग्य असतो. यातून मिळणारा कोंडा गाय-बैलांना खाद्य म्हणून दिला जातो. ज्या भागात भाताची लागवड होते, त्या जमिनीत भात पिकानंतर लगेच कडधान्याची पिकं घेता येतात. कारण भातपिकामुळे जमिनीत ओलावा कायम राहतो. तसंच जमिनीत नैसर्गिक नायट्रोजनचं प्रमाण चांगलं राहतं, असं ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - भात खाल्ल्यावर सुस्ती येते? दुपारी जेवल्यावर येणारी झोप टाळण्यासाठी ‘ही’ पद्धत वापरा त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारातून भात वगळणं योग्य नाही. उलट वाढत्या वयातली मुलं आणि युवकांसाठी भात हा उत्तम आणि फायदेशीर ठरणारा पदार्थ आहे.
First published: