वजन कमी करण्यासाठी डाएट करताय तर सावधान ! तज्ज्ञही सांगतात ‘हा’ डाएट करू नका

वजन कमी करण्यासाठी डाएट करताय तर सावधान ! तज्ज्ञही सांगतात ‘हा’ डाएट करू नका

वजन कमी करणं म्हटलं की किटोजेनिक डाएट (Kitogenic diet) आलं. ज्याला किटो डाएट असंही म्हणतात. या डाएटमुळे वजन कमी होत असलं, तरी आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं. आरोग्य तज्ज्ञ याबाबत काय म्हणत आहेत, पाहुयात.

  • Share this:

तुमचं वजन वाढलं आहे आणि ते घटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. एखादा डाएट प्लॅन सुरू करू असा विचार तुम्ही करत आहात. तर आधी थोडं थांबा आणि हे वाचा. वजन घटवणं म्हटलं की फेमस आहे ते किटो डाएट. वजन घटवण्यासाठी उत्तम असा हा डाएट मानला जातो. मात्र तरी त्याचे अनेक तोटे आहेत. अगदी डॉक्टरही सांगत आहात की हा डाएट करू नका.

किटो हानिकारक कसा?

यूएसए टुडेच्या मते, किटोजेनिक डाएटमध्ये लो कार्बोहायड्रेट, हाय फॅट आणि हाय प्रोटिन डाएट.

शरीराला आवश्यक असलेल्या एकूण कॅलरीजपैकी जवळपास 70 ते 80% कॅलरी फॅटपासून, 20% कॅलरी प्रोटिनपासून आणि ५% कॅलरी कार्बोहायड्रेमधून मिळते.

कार्बोहायड्रेट्सच्या कमतरतेमुळे शरीर केटोसिस होते, म्हणजे तिथं फॅट हे ऊर्जेचं प्राथमिक सोर्स आहे.

यामुळे वजन झपाट्याने कमी होत असलं तरी आपल्या आरोग्यासाठी शरीराला आवश्यक असलेले पदार्थ पुरेशा प्रमाणात मिळत नाही.

यामध्ये धान्यं, फळं आणि काही भाज्यांचा समावेश आहे.

किटो डाएटबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

वजन कमी करणं आणि आपलं एकंदर आरोग्य यातील फरक समजून घ्यावा असं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या प्राध्यापक वासंती मलिक म्हणाल्या, "धान्ये, फळं आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स, पॉलिफेनॉल्स, फायबर असे शरीराला आवश्यक न्यूट्रिएंट्स असतात. हे न्यूट्रिएंट्स कार्डिओमेटाबोलिक हेल्थसाठी फायदेशीर आहेत"

माऊंट सनाई हार्ट्स मेरी-जोसीचे वैद्यकीय संचालक जेफ्री मेकॅनिक म्हणाले, "कार्बोहायड्रेट कमी केल्यानं शरीर सक्रीय ठेवण्यासाठी फॅट आणि मसल टिश्यूंवर भार येतो. जर तुम्ही कार्बोहायट्रेड्सट घतले नाहीत, मात्र जास्तीत जास्त फॅट आणि प्रोटिन घेतलं, तरी तुमचे टिश्यू वाया जाऊ शकतात, हे टिश्यू बर्न होतात"

सोर्स - ANI

अन्य बातम्या

सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणं घातक, 'या' ड्रिंकने करा दिवसाची सुरुवात

महाभयंकर कॅन्सरला दूर ठेवायचं आहे... मग फक्त 20 मिनिटं चाला

First published: January 27, 2020, 7:59 AM IST

ताज्या बातम्या