मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त वेदनाच नाही तर झपाट्यानं कमी होणारं वजनही आहे पाठदुखीचं लक्षण

फक्त वेदनाच नाही तर झपाट्यानं कमी होणारं वजनही आहे पाठदुखीचं लक्षण

कोरोना लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना शरीराची फारशी हालचाल होत नसतानाही तुमचं वजन कमी (weight loss) होत आहे, तर याला कारणीभूत आहे ती पाठदुखी (back pain).

कोरोना लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना शरीराची फारशी हालचाल होत नसतानाही तुमचं वजन कमी (weight loss) होत आहे, तर याला कारणीभूत आहे ती पाठदुखी (back pain).

कोरोना लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना शरीराची फारशी हालचाल होत नसतानाही तुमचं वजन कमी (weight loss) होत आहे, तर याला कारणीभूत आहे ती पाठदुखी (back pain).

  • myupchar
  • Last Updated :
पाठदुखी (back pain) ही एक सामान्य समस्या आहे आणि बर्‍याच लोकांनी याचा अनुभव कधीतरी घेतला असावा. पूर्वी ही समस्या वयोवृद्ध किंवा मध्यमवयीन लोकांमध्ये पाहिली जात होती, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येदेखील ही समस्या दिसून येते. लॅपटॉप किंवा संगणकासमोर सतत बसणं, शारीरिक हालचालींचा अभाव, अयोग्य पद्धतीनं बसणं, अचानक चुकीच्या पद्धतीनं उठणं किंवा एखादी वस्तू उचलणं, दीर्घकाळ उभे राहणं, निरोगी आहार, संधिरोग, स्नायूंचा ताण, गर्भधारणा किंवा जास्त शारीरिक काम करण्यासारख्या कारणांमुळे पाठदुखीचा अनुभव येतो. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं, पाठदुखीचा त्रास सुरू झाल्यावर काही अशी लक्षणं जाणवू लागतात जणू काही पाठीच्या दुखण्याबरोबरच वेदना पायांपर्यंत जात आहेत आणि गुडघ्याखाली देखील वेदना होतात. इतर लक्षणांमध्ये कमरेवर सूज येणं, लघवी होण्यास अडचण येणं, शरीराचं तापमान वाढणं, नितंबांच्या सभोवतालचा क्षेत्र सुन्न होणं यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर जर तुमचं वजन कमी होत असेल तर ते पाठदुखीच्या समस्येचं लक्षणही असू शकते. सामान्यतः पाठदुखीचा त्रास काही दिवस, आठवड्यांत संपत असला तरी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. 20 वर्षांपेक्षा कमी आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, कर्करोगाने ग्रस्त रुग्ण, कमजोर रोगप्रतिकारक प्रणाली असलेले रुग्ण किंवा काही महिन्यांसाठी स्टिरॉइड्स घेणारे रुग्ण यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. या चाचण्या असू शकतात आवश्यक या समस्येचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी आवश्यक आहे. यासाठी डॉक्टर उभं राहण्याची आणि चालण्याची क्षमता पाहतात. याशिवाय ते पायांची ताकद, पाठीच्या कण्याची हालचाल, पायांमध्ये हालचाल ओळखण्याची क्षमता देखील तपासतात. गंभीर परिस्थितीत डॉक्टर रक्त आणि लघवीची तपासणी करण्या सांगू शकतात. पाठीचा एक्स-रे देखील केला जाऊ शकतो. तसंच,गंभीर प्रकरणांमध्ये डिस्क, अस्थिबंधन, स्नायू, नसा आणि रक्तवाहिन्यांचं मूल्यांकन करण्यासाठी संगणकीय टोमोग्राफी स्कॅन किंवा एमआरआय केलं जाऊ शकतं. इतकंच नाही तर हाडांच्या स्कॅनद्वारे आपण हाडांच्या ऊतींमधील विकृतीदेखील पाहू शकता. असे होतील उपचार पाठीचा त्रास बहुतेक आठवडाभरात घरगुती उपचारांनी बरा होतो. यासाठी ओव्हर-द-काउंटर पेनकिलर आणि गरम कॉम्प्रेस किंवा बर्फ वापरण्याची आवश्यकता लागू शकते. आपल्या सामर्थ्यानुसार कार्य करणं आणि विश्रांती न घेणं चांगलं आहे. हलका उपक्रम सुरू ठेवा. मात्र वेदना वाढवणारी क्रिया करणं टाळा. हे करून आराम न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. धूम्रपान टाळा जर तुम्ही पाठीच्या दुखण्यादरम्यान थोडी विश्रांती घेतली तर तुम्हाला फायदा होईल. अशा व्यक्तीनं धूम्रपान करू नये कारण पाठीच्या कण्यामध्ये रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. उंच टाचांच्या चप्पल घालू नये. चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, म्हणून त्याबद्दल विशेष काळजी घ्यावी. चुकीचा पद्धतीने वजन उचलणं टाळा कारण पाठीच्या दुखण्यामागचे हे सामान्य कारण आहे. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - आरोग्याच्या सामान्य समस्या न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Health, Pain, Weight loss

पुढील बातम्या