मुंबई, 29 मार्च : अनेकांना उन्हाळ्याची सुट्टी असते. अशा वेळी स्वत:कडे लक्ष देता येतं. वजन कमी करायचं असेल तरीही तुम्ही फोकस करू शकता. अशा वेळी तुम्ही मिलिट्री डाएट फाॅलो करू शकता. या डाएटमुळे तुम्ही 3 दिवसांत 4 ते 5 किलो वजन कमी करू शकता. फक्त अट इतकीच की जेवणाच्या मधे दुसरं कुठलं स्नॅक्स तुम्ही घेऊ नका.
हा डाएट प्लॅन तुम्ही फाॅलो करून वजन कमी करू शकता. यात तुम्हाला व्यायामाचीही गरज नाही. या डाएटमध्ये फूड काॅम्बिनेशन असं ठेवलंय की त्यामुळे तुमचे फॅट बर्न होतील, मेटाबाॅलिझम चांगला राहील आणि वजन कमी होईल.
डाएटच्या पहिल्या दिवशी तुम्ही ब्रेफास्टला एक ब्रेड खा. त्यावर दोन चमचे पिनट बटर लावा. याशिवाय एक अर्ध आंबट फळ आणि काॅफी किंवा चहा घेऊ शकता. दुपारी जेवणात अर्धा कप टुना माशाची आमटी, एक ब्रेड, एक कप चहा किंवा काॅफी घ्या. रात्री जेवणात 85 ग्रॅम मटण, एक कप हिरव्या बिन्स, छोटं सफरचंद, अर्ध केळं आणि एक कप व्हॅनिला आइस्क्रीम घ्या.
डाएटच्या दुसऱ्या दिवशी नाश्त्यात एक ब्रेड, एक उकडलेलं अंडं आणि अर्ध केळ घ्या. दुपारच्या जेवणात एक उकडलेलं अंडं, एक कप पनीर, 5 साॅल्टाइन क्रॅकर्स बिस्किटं खा. रात्री जेवणात 2 हाॅट डाॅग्स ( बनशिवाय ), अर्धा कप गाजर, अर्धा कप ब्रोकोली, अर्ध केळं आणि अर्धाकप व्हॅनिला आइस्क्रीम घ्या.
डाएटच्या तिसऱ्या दिवशी नाश्त्यात एक कप पनीर, एक सफरचंद, 5 साॅल्टाइन क्रॅकर्स बिस्किटं घ्या. दुपारी एक अंडं आणि एक ब्रेडचा तुकडा खा. रात्री जेवणात एक कप टुना, अर्ध केळं, एक कप व्हॅनिला आइस्क्रीम घ्या. चहा किंवा काॅफी घेत असाल तर ती साखरेशिवाय घ्या. या डाएटमध्ये ताजी फळं आणि भाज्या घ्या. यात फायबर जास्त आहे.
तुम्ही डाएटकडे लक्ष दिलंत तर वजन कमी होईल. जंक फूड अजिबातच खाऊ नका.
उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले