Home /News /lifestyle /

कमी केलेलं वजन पुन्हा वाढायला नको नसेल, तर अशी घ्या काळजी

कमी केलेलं वजन पुन्हा वाढायला नको नसेल, तर अशी घ्या काळजी

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपलं पोट भरलेलं वाटत राहतं. त्यामुळे सतत भूक लागत नाही भूक न लागल्याने आपण जास्त जेवण घेत नाही आणि वजन कमी राहतं.

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आपलं पोट भरलेलं वाटत राहतं. त्यामुळे सतत भूक लागत नाही भूक न लागल्याने आपण जास्त जेवण घेत नाही आणि वजन कमी राहतं.

अनेक लोक मोठ्या मेहनतीनं वजन कमी करतात; पण त्यानंतर व्यायाम आणि योग्य आहार यात खंड पडल्यास पुन्हा वजन वाढल्याचं (Weight Gain) दिसून येतं.

नवी दिल्ली, 15 जुलै: प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं वजन कमी करणं (Weight loss) हे मोठं आव्हान असतं. वजन नियंत्रणात ठेवणं आरोग्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. त्यामुळं प्रत्येकाने आपलं वजन नियंत्रणात राहण्यासाठी नियमित व्यायाम (Exercise) आणि योग्य आहार (Diet) घेणं आवश्यक आहे. अनेक लोक मोठ्या मेहनतीनं वजन कमी करतात; पण त्यानंतर व्यायाम आणि योग्य आहार यात खंड पडल्यास पुन्हा वजन वाढल्याचं (Weight Gain) दिसून येतं. हे टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा वजन घटवण्यासाठी केलेली सर्व मेहनत वाया जाऊ शकते. 'झी न्यूज इंडिया'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएटचा अवलंब करतात. काही जण वजन कमी करण्यासाठी आहार कमी करतात. त्यासाठी बहुतांश वेळी ब्रेकफास्ट (Breakfast) अर्थात न्याहारी किंवा नाश्ता करणं टाळलं जातं; मात्र हीच सवय घातक ठरू शकते. नाश्ता केला नाही, तरी तुमचं वजन वाढू शकतं. कारण, न्याहारीमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास दीर्घ काळ तुमचं पोट भरलेलं राहतं आणि तुम्ही अपायकारक पदार्थ खात नाही. Shocking! घामापासून सुटका मिळवण्यासाठी ऑपरेशन केलं, फिटनेस मॉडेलने गमावला जीव वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये (Gym) जातात तेव्हा वेटलिफ्टिंगचे व्यायाम (Weightlifting) प्रामुख्यानं केले जातात. कारण वजन कमी करण्यासाठी हे व्यायाम उपयुक्त ठरतात. या व्यायामप्रकारांमुळे शरीराचा चयापचय (Metabolism) दर वाढतो. त्यामुळे चरबीचं मोठ्या प्रमाणात ज्वलन होतं; मात्र वजन कमी झाल्यानंतर हे व्यायाम करणं बंद केलं जातं. त्यामुळे पुन्हा शरीराचा चयापचय दर कमी होतो आणि चरबी साठू लागते. हे टाळण्यासाठी वजन कमी झाल्यानंतरही आठवड्यातून किमान 3 ते 4 दिवस वेटलिफ्टिंगचे व्यायाम करणं आवश्यक आहे. कमी केलेलं वजन पुन्हा वाढण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे जुन्या वाईट सवयी (Bad Habits) पुन्हा सुरू करण्याचं. गोड पदार्थ, जंक फूड खाणं (Junk Food), मद्यपान (Drinking Alcohol) किंवा धूम्रपान(Smoking) करणं आदी सवयींचा समावेश आहे. या सवयी पुन्हा सुरू केल्यानं वजन पुन्हा वाढू लागतं. वजन वाढू नये अशी इच्छा असेल, तर गोड, जंक फूड खाणं टाळा, मद्यपान, धूम्रपान करू नका. Immunity वाढवायची असेल तर, ‘हे’ पदार्थ पावसाळ्यात खाणं करा बंद खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींबरोबरच, अपुरी झोप (Sleep) हेदेखील वजन वाढण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. पुरेशी झोप झाली नाही तर शरीर थकतं आणि चयापचय दर कमी होतो. त्यामुळे आपल्या शरीरातलं चरबीचं(Fat) ज्वलन होत नाही आणि वजन वाढतं. आपल्या मित्रमैत्रिणींच्या, कुटुंबीयांच्या सवयींचा प्रभाव हेदेखील वजन वाढण्याचं एक कारण ठरू शकतं. अनेकदा आपण त्यांच्या सवयींमुळे आपल्याही खाण्यापिण्याच्या सवयी बदलतो. उदाहरणार्थ, आपल्या घरात प्रत्येकाला गोड खाण्याची सवय असेल तर तुम्हालाही गोड खाण्याची सवय लागते. तुम्ही निग्रहपूर्वक अशा सवयी टाळल्या नाहीत तर तुमचं वजन कधी वाढलं हे तुम्हाला कळणारदेखील नाही. तेव्हा कष्टानं कमी केलेलं वजन पुन्हा वाढवायचं नसेल, तर या सवयी टाळा आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवा.
First published:

Tags: Weight gain, Weight loss

पुढील बातम्या