मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

झटपट वजन कमी करण्यासाठी ही धान्य आहेत गुणकारी; असा करा आहारात समावेश

झटपट वजन कमी करण्यासाठी ही धान्य आहेत गुणकारी; असा करा आहारात समावेश

Weight Loss Food:  वजन घटवण्यासाठी विविध डाएट प्लान वापरले जातात. पण, वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी विशिष्ट धान्यांचा आहारात वापर केला आहे का?

Weight Loss Food: वजन घटवण्यासाठी विविध डाएट प्लान वापरले जातात. पण, वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी विशिष्ट धान्यांचा आहारात वापर केला आहे का?

Weight Loss Food: वजन घटवण्यासाठी विविध डाएट प्लान वापरले जातात. पण, वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी विशिष्ट धान्यांचा आहारात वापर केला आहे का?

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : अलिकडे वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) अनेकजण विविध पर्याय अवलंबत असतात. काहीजण आहारातून विविध प्रकारच्या गोष्टी खाण्याचे टाळतात. वजन घटवण्यासाठी विविध डाएट प्लान वापरले जातात. पण, वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी विशिष्ट धान्यांचा आहारात वापर केला आहे का? जर नसेल तर आज आपण जाणून घेऊया की, अशी काही तृणधान्ये आहेत, ज्यांचा नेहमी आहारातील समावेश जास्त मेहनत न करता तुमचे वजन झपाट्याने कमी करण्यात यशस्वी होऊ (Weight Loss Food) शकता. आजच्या लेखात आपण वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तृणधान्यांविषयी माहिती घेऊया.

ज्वारी - ज्वारीची भाकरी अनेकांच्या घरी बनवली जाते. तुमची वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ज्वारी तुमच्या उपयोगी आहे. त्यात बी व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक अ‌ॅसिड आणि टॅनिनसारखे पोषक घटक आढळतात. जर तुम्ही तुमच्या आहारात ज्वारी रोटीचा समावेश केला तर तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होऊ शकते.

बाजरी

वजन कमी करण्यासाठी बाजरी देखील खूप चांगली भूमिका बजावते. आपण तिचा नेहमीच्या आहारातदेखील समावेश करू शकता. बाजरी प्रथिने, फायबर, लोह आणि कॅल्शियमसारख्या पोषक घटकांनी समृद्ध आहे. एवढेच नव्हे तर बाजरीची अनेक प्रकारच्या आजारांना कमी करण्यातही खूप मदत होते. बाजरीच्या पीठाची भाकरी खाणे आरोग्याला फायदेशीर आहे. जर तुम्हाला भाकरी खाणं आवडत नसेल, तर तुम्ही बाजरीची खिचडी बनवूनही याचे सेवन करू शकता.

हे वाचा - T20 World Cup: ‘तू धोनी आहेस तर मी…’प्रॅक्टीस एरियात धोनीला पाहताच पाकिस्तानच्या बॉलरची प्रतिक्रिया VIDEO

नाचणी

तुम्ही तुमच्या आहारात नाचणीचाही समावेश करू शकता. हे केवळ वजन कमी करण्यातच मदत करत नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीही अनेक फायदे मिळवून देतात. नाचणीमध्ये भरपूर फायबर आढळतात, त्यामुळे ती खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. यासोबतच त्याच्या सेवनाने बुद्धीही चाणाक्ष तीक्ष्ण होते.

हे वाचा - अनन्या पांडेनं NCB समोर दिली कबुली, धक्कादायक खुलाशानंतर आर्यन खानच्या अडचणीत भर

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight loss, Weight loss tips