फक्त माऊश फ्रेशनर म्हणून नाही तर पोटासंबंधी समस्यांवरही फायदेशीर आहे बडीशेप

फक्त माऊश फ्रेशनर म्हणून नाही तर पोटासंबंधी समस्यांवरही फायदेशीर आहे बडीशेप

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी हे बडीशेप किती गुणकारी आहे हे जाणून घ्या.

  • Last Updated: Aug 13, 2020 07:43 PM IST
  • Share this:

अनेकजण जेवणानंतर तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून बडीशेप खातात. बडीशेप फक्त माऊथ फ्रेशनरचे काम करत नाही तर ती शरीराच्या अनेक समस्यांवर पण उपचार करते. बडीशेप एक आयुर्वेदिक औषध आहे जे स्वयंपाकघरात मसाल्यासोबत ठेवले जाते. बडीशेपमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम, सोडियम, लोह, पोटॅशियम यासारखी मूलद्रव्ये असतात. म्हणूनच तिचा उपयोग औषधाच्या रुपात केला जातो. बडीशेप आरोग्यासाठी कशी फायद्याची आहे. जाणून घेऊ या -

वजन कमी करण्याचा सोपा उपाय

बडीशेपमध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. बडिशेप खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. त्यात कॅलरी जवळपास नसतातच. त्याने वजन कमी करायला मदत होते. बडिशेप शरीरात चरबी साठू देत नाही, त्याने लठ्ठपणा कमी होतो. याशिवाय बडिशेपचा चहा प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकली जातात. बडीशेपच्या बिया खाल्ल्याने शरीराचं चयापचय मजबूत होतं. चयापचय चांगलं राहिलं तर वजन कमी करण्यास मदतच होते.

बद्धकोष्ठता दूर होते

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, बडीशेपमधील तंतुमय पदार्थ शरीरातील पचनक्रिया चांगली करतात. त्याने बद्धकोष्ठता दूर होते. बडीशेप नियमित खाल्ल्याने वात आणि पित्ताची समस्या होत नाही. ज्यांना नेहमी अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत असते त्यांनी बडीशेपेचं चूर्ण नियमित खावं. त्यासाठी बडीशेप आणि साखर यांचं चूर्ण बनवावं. 5 ग्रॅम चूर्ण कोमट पाण्यात टाकून रात्री झोपताना घ्यावं. हा उपाय जर रोज केला तर पोट साफ होईल आणि यकृतही स्वस्थ राहील.

लहान मुलांसाठी हा उपाय अतिशय परिणामकारक आहे. लहान मुलांची पचनाची समस्या दूर करण्यासाठी दोन चमचे बडीशेपेचे चूर्ण दोन कप पाण्यात ते एक चतुर्थांश राहिल इतकं उकळून घ्या. त्यानंतर ते थंड करून गाळून घ्या. ते पाणी एक-एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा मुलांना पाजा त्याने त्यांची पोटाच्या सर्व समस्या दूर होतील.

नजर चांगली होते

बडीशेप डोळ्यांची नजर चांगली करते. जर रोज जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाल्ली किंवा रात्री झोपताना अर्धा चमचा बडीशेपचे चूर्ण  एक चमचा साखर, दूध किंवा पाण्यासोबत घेतलं तर त्याने डोळे चांगले होतात.

स्मरणशक्ती वाढवते

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, स्मरणशक्ती वाढवण्यात बडीशेप फायदेशीर आहे. त्यासाठी बडीशेप आणि साखरेचं चूर्ण बनवून घ्या. हे चूर्ण सकाळी दोन चमचे आणि रात्री दोन चमचे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. तसंच जास्त खोकला येत असेल तर बडीशेप आणि लवंग खाणं फायद्याचं ठरतं. बडीशेपचा 10 ग्रॅम रस मधात मिसळून दिवसातून दोन तीन वेळा घेतल्यास खोकला बरा होतो. याशिवाय याचा काढा बनवण्यासाठी एक चमचा बडीशेप, दोन चमचे ओवा, एक ग्लास पाण्यात उकळवा, त्याला गाळून घ्या आणि मग मधासोबत मिसळून घेतल्याने खोकला दूर होतो.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पचनसंस्थेचे विकार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 13, 2020, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading