हायफाय डाएटने नाही, तर या 5 गोष्टी केल्यात तर कधीच नाही वाढणार वजन

हायफाय डाएटने नाही, तर या 5 गोष्टी केल्यात तर कधीच नाही वाढणार वजन

वजन वाढूच नये म्हणून काय करता येईल? यासाठी कुठलंही हायफाय डाएट किंवा वर्कआउट आम्ही सांगणार नाही. फक्त या 5 सवयी बदला किंवा नव्या सवयी लावून घ्या. हे बदल केलेत तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही.

  • Share this:

मुंबई : लठ्ठपणा किंवा ओबेसिटीचं आपल्या देशात प्रमाण वाढत आहे. भारतीयांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण इतर पाश्चिमात्य देशांच्या मानाने कमी असायचं, कारण भारतीय आहार आपल्या वातावरणाशी सुसंगत असल्याचं सांगितलं जातं. पण बदलत्या जीवनशैलीबरोबर आपल्या सवयी बदलल्या आणि आहारही बदलला. त्यामुळे भराभर वजन वाढण्याची समस्या उद्भवली. अवेळी खाणं, पचन नीट न होणं, मानसिक ताण, व्यायामाचा अभाव, बैठं काम या कारणामुळे वजन वाढतं. पुरुष आणि स्त्रियांमध्ये वजन वाढण्याची कारणं वेगवेगळी असली, तरी सवयी याच आहेत.

वाढलेलं वजन कमी करणं सोपं नाही, हे या प्रयत्नात असलेला कुणीही सांगू शकेल. पण वजन वाढूच नये म्हणून काय करता येईल? यासाठी कुठलंही हायफाय डाएट किंवा वर्कआउट आम्ही सांगणार नाही. फक्त या 5 सवयी बदला किंवा नव्या सवयी लावून घ्या. हे बदल केलेत तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही.

1. रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर करा

कामाच्या वाढत्या वेळामुळे घरी यायची वेळ लांबली आहे. प्रवास करून घरी पोहोचलो की, भरपूर भूक लागते आणि भरपूर आवडता आहार खाल्ला जातो. ऑफिस पार्टीचीही वेळ रात्रीच असते. पण उशीरा आणि जड जेवणामुळे पचनक्रिया बिघडते आणि हमखास वजन वाढतं. रात्रीचं जेवण 8 नंतर घेऊच नये.

संबंधित - एका जागी बसून सलग 9 तासांपेक्षा जास्त काम करता? सावधान! ऐका मृत्यूची घंटा

आहार मोजका आणि पचायला हलका असा हवा. शक्यतो घरचं अन्न खाण्यावर भर हवा.

2. स्ट्रेस मॅनेजमेंट

अनेकांना हे माहीत नसतं किंवा लक्षात येत नाही, पण वजन वाढण्याचा संबंध मानसिक स्थितीशीसुद्धा आहे. मानसिक तणाव हे वजन वाढण्यामागचं मोठं कारण आहे. मानसिक ताण-तणाव कुणाला चुकलेले नाहीत. पण त्याचा किती त्रास करून घ्यायचा हे ठरवायला हवं.

संबंधित - इतक्या दिवसांमध्ये वजन कमी केलं तर डायबेटीसचा धोका होईल कमी

तणाव व्यवस्थापन केलंत तर वजन नक्की नियंत्रणात राहील. मानसिक स्वास्थ्य शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे.

3. पुरेशी रात्रीची झोप

वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. जागरणांमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. अॅसिडिटी वाढते आणि त्याचा परिणाम वजनावरही होतो.

संबंधित - या 10 कारणांनी पूर्ण झोप होऊनही जाणवतो थकवा...

लवकर झोपून लवकर उठलात तर वजन नियंत्रणात राहील.

4. नियमित व्यायाम

आपलं बहुतांश काम बैठं असतं. त्यामुळे नियमित व्यायाम आवश्यक आहे. आठवड्याला किमान 150 मिनिट शारीरिक हालचाली होतील असा व्यायाम म्हणजे चालणं, फिरणं, सायकल वगैरे किंवा 75 मिनिटं हाय इन्टेन्सिटी म्हणजे पोहणं, धावणं किंवा जीमिंग, वेट एक्सरसाइज व्यायाम करायलाच हवा.

5.जेवणाच्या वेळा आणि शरीराचं म्हणणं

जेवणाच्या वेळा सांभाळायला हव्यात. भूक लागेल तेव्हा आणि भूक असेल तितकंच खायला हवं हेही खरं. पण काम संपत नाही म्हणून भूकेची वेळ टळून गेली तर उपाशी बसणं किंवा आवडीचं दिसलं म्हणून चार घास जास्त खाणं या दोन्हीमुळे वजन वाढतं.

--------------------------------------

इतर काही बातम्या

अॅक्टिंगची हौस! मेंढपाळाने केलेला सलमान खानच्या गाण्याचा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

फेसबुकवर फोटो शेअर करण्यापूर्वी एकदा करा विचार, नाही तर कधीच इम्प्रेस होणार नाही

VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ

आल्याचं पाणी प्या आणि हे आजार दूर करा!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 12, 2019, 6:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading