Elec-widget

वजन कमी करायचं असेल तर आधी दूर ठेवा हे 10 गैरसमज

भात सोडायला हवा, फ्रूट डाएट हवं... वजन कमी करण्यासाठी तुम्हालाही हा सल्ला मिळालाय का? खरंच वजन घटवायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर आधी अशा 10 गैरसमजुतींपासून राहा दूर.

  • Share this:

वजन कमी करायचं असेल तर आधी त्यासंबंधीच्या अनेक ऐकीव मिथकांना दूर ठेवलं पाहिजे. अशीच काही प्रचलित 10 मिथकं - ज्यानं कधीच वजन कमी होणार नाही.

वजन कमी करायचं असेल तर आधी त्यासंबंधीच्या अनेक ऐकीव मिथकांना दूर ठेवलं पाहिजे. अशीच काही प्रचलित 10 मिथकं-ज्यानं कधीच वजन कमी होणार नाही.

वजन कमी करायचं असेल तर कमी खा. फक्त फळांवर दिवस काढा वगैरे सगळं चुकीचं आहे. संतुलित आहार आणि व्यायामाखेरीज वजन कमी झालं तरी ते टिकणार नाही.

जिममध्ये जात असलात तर प्रोटिन सप्लिमेंट्स घेतलीच पाहिजेत - हा एक गैरसमज. खाद्यपदार्थांची जागा सप्लिमेंट्स घेऊ शकत नाहीत. काही कमतरता असेल तर ती भरून काढायचं काम सप्लिमेंट करतात.

वजन घटवण्यासाठी नुसते कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आणि प्रोटिन्स वाढवायचे! हे चूक आहे. कारण वजन कमी करायचं असेल तर चरबी घटली पाहिजे. आणि ते प्रोटीन्स, कार्ब्स आणि चांगले फॅट्स यांच्या संतुलनातूनच होईल.

जिममधल्या व्यायामाने सांधेदुखी होते, हा गैरसमज आहे. व्यायामाचा आणि हाडांच्या दुखण्याचा संबंध नाही. असलाच तर व्यायामाच्या कमतरतेमुळे आजार होऊ शकतात.

Loading...

व्यायाम करायचा नसेल तरी फक्त डाएट करून वजन कमी होतं. हे अर्धसत्य आहे. कारण असं कमी झालेलं वजन वाढतंही पटकन. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर व्यायाम हवाच.

फक्त कॅलरीवर लक्ष ठेवलं की झालं! - एका समोशात समजा 288 कॅलरीज आहेत आणि संत्र्यामध्ये आहेत 48 कॅलरीज.. तर एका सामोशाच्या बदल्यात 6 संत्री खाल्ली असा साधा हिशोब करून वजन कमी होणार नाही.

भात, पोळी सोडलं की वजन कमी होईल. फक्त प्रोटीन्स खायचे. हे चूक आहे. भारतीय शरीराला आणि हवेला कार्बोहायड्रेट्स हवेतच.

ठरावीक डाएट केलं तरच वजन कमी होईल. हेसुद्धा खरं नाही. प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. पुरेसं जेवण केलंच पाहिजे. कमी खाऊनही वजन वाढू शकतं.

जास्त आहार असणाऱ्यांचं वजन कमी होत नाही. हेसुद्धा चुकीचं. कारण तुम्ही कुठल्या वेळेला किती खाता हे महत्त्वाचं. पचनशक्ती असेल तर खाणं जास्त असेल तरी चालेल. जोडीला व्यायाम मात्र हवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 08:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...