मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वजन वाढवायचंय? व्यायामापूर्वी हे पदार्थ आवर्जून खा; पाहा किती दिवसात दिसतो फरक

वजन वाढवायचंय? व्यायामापूर्वी हे पदार्थ आवर्जून खा; पाहा किती दिवसात दिसतो फरक

दिल्ली, 30 नोव्हेंबर: चुकीचा आहार आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आज अनेक जण लठ्ठपणाचा (Obesity) सामना करत आहेत. वाढत्या वजनामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. एकीकडे काही जण लठ्ठपणामुळे त्रस्त असताना दुसरीकडे काही जणांना वजन वाढत नसल्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पीळदार शरीरयष्टी हे युवकांचं स्वप्न असतं.

व्यायामाबरोबर हवा आहारही

बरेच युवक पीळदार शरीरयष्टीसाठी व्यायामावर भर देतात. जिममध्ये जाऊन वर्कआउट (Workout) करतात. परंतु, तरीदेखील काही सडपातळ युवकांच्या शरीरयष्टीत कोणताही फरक दिसून येत नाही. सडपातळ असलेल्या युवकांनी पीळदार शरीरयष्टीसाठी जसा व्यायाम (Exercise) करणं आवश्यक आहे, तसंच योग्य आहारावरही (Diet) लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. नियमित व्यायामानं स्नायू मजबूत होतात. त्याला योग्य डाएट प्लॅनची जोड दिली तर वजन झटकन वाढू शकतं. वजन वाढण्यासाठी (Weight Gain) कोणते पदार्थ उपयुक्त ठरू शकतात, प्री वर्कआउट डाएट प्लान (Pre Workout Diet Plan) कसा असावा, याविषयी आरोग्य डाएट आणि न्यूट्रिशन क्लिनिकच्या डाएटिशियन डॉ. सुगीता मुटरेजा यांनी मार्गदर्शन केलं आहे. याबाबतची माहिती `ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम`ने दिली आहे.

24 मिनिटांत एकट्यानं संपवलं सात जणांचं जेवण, मेन्यू ऐकूनच येईल ढेकर

योग्य पद्धतीने वजन वाढावं यासाठी दैनंदिन आहारात काही पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. याबाबत डॉ. मुटरेजा यांनी सांगितलं, की व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी हेल्दी डाएट घेणं आवश्यक आहे. यामुळे शरीराला भरपूर कॅलरीज मिळतात आणि वजन हळूहळू वाढू लागतं. तसंच स्नायूदेखील मजबूत होतात.

दलिया (Dalia) : वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढवायचं असेल, तरी रिकाम्या पोटी व्यायाम करणं चुकीचं आहे. तुम्ही वजन वाढावं यासाठी व्यायाम करत असाल तर वर्कआउटपूर्वी दलिया खाणं हितावह असतं. दलियाच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. दलियात फायबरसह अन्य पोषक घटक असतात. त्यामुळे वर्कआउटपूर्वी दलिया खाणं सर्वोत्तम ठरतं.

पत्ताकोबी खाण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, अन्यथा एक चूक पडेल महागात

ड्रायफ्रूटस (Dry fruits) : ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक असतात. तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर वर्कआउटपूर्वी ड्रायफ्रूट्सचं सेवन करावं. प्री-वर्कआउट डाएटमध्ये तुम्ही बदाम (Almond), काजू (Cashew), पिस्ता, अक्रोड, किसमिस यांचा समावेश करू शकता. व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी मूठभर ड्रायफ्रूट खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

डेअरी उत्पादनं (Dairy Products) : वजन वाढवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थदेखील फायदेशीर ठरतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचं प्रमाण मुबलक असतं. वजन वाढावं यासाठी दररोज पनीर (Paneer), दूध (milk), दही आणि तूप (Ghee) खाऊ शकता. दुग्धजन्य पदार्थांमुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात.

Weight Loss : 3 महिन्यात पोटावरील चरबी होईल गायब, या टिप्स ठरतील उपयोगी

अंडी (Eggs) : वजन वाढावं यासाठी तुम्ही प्री-वर्कआउट डाएटमध्ये अंड्याचा समावेश जरूर करावा. अंड्यात प्रोटीनसह अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे वर्कआउटपूर्वी 1 किंवा 2 अंडी खाणं योग्य ठरतं. तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी व्यायाम करत असलात, तरी डाएटमध्ये अंड्याचा समावेश जरूर करा.

ब्राउन राइस आणि चिकन (Brown Rice And Chicken) : तुम्ही मांसाहार करत असाल, तर प्री-वर्कआउट डाएटमध्ये ब्राउन राइस आणि चिकनचा अवश्य समावेश करू शकता. तुम्ही सायंकाळी वर्कआउट करत असाल तर ब्राउन राइस आणि चिकन हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. चिकन सेवन केल्यास स्नायू बळकट होतात आणि वजन वाढू लागतं.

ग्रेनोला बार (Granola Bar) : प्री-वर्कआउट डाएटमध्ये तुम्ही ग्रेनोला बार किंवा एनर्जी बारचा समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेटस असतात. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. ग्रेनोला बारमध्ये फॅट आणि फायबर्स कमी प्रमाणात असतात. रोज व्यायामापूर्वी ग्रेनोला बार खाणं फायदेशीर ठरू शकतं.

दूध आणि केळी (Milk And Banana) : अशक्त दिसत असाल, तर रोज दूध आणि केळं खाण्याचा सल्ला अनेक जण देतात. दूध आणि केळी एकत्र खाल्ल्यास वजन वेगानं वाढू लागतं. केळ्यांमध्ये साखर आणि स्टार्च असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स मुबलक असतात. त्यामुळे दररोज व्यायामापूर्वी 45 मिनिटं दूध आणि केळी खाणं फायदेशीर ठरतं. एक ग्लास दुधासोबत 2 केळी खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

पीनट बटर (Peanut Butter) : वजन वाढावं यासाठी व्यायामापूर्वी पीनट बटर खाणं फायदेशीर ठरतं. व्यायामापूर्वी होल व्हीट किंवा मल्टीग्रेन ब्रेडसह पीनट बटर खाल्ल्यास वजनावर चांगला परिणाम दिसून येतो. तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर ब्राउन ब्रेड आणि पीनट बटर सॅंडविच खाऊ शकता.

हिवाळ्यात या लोकांनी काजू खाणे टाळावे; त्यांच्या समस्या आणखी होतील गंभीर

डाळ (Dal) : दररोज व्यायामापूर्वी डाळ पिणं हितकारक असतं. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. वजनवाढीसाठी प्रोटीनची गरज असते. प्रोटीनमुळे स्नायूंची जडणघडण चांगली होते. डाळींमध्ये प्रोटीन मुबलक असल्यानं वजन लवकर वाढतं. त्यामुळे व्यायामापूर्वी हरभरा, मूग डाळ, मोड आलेली कडधान्यं, सोयाबीन, मसूर डाळ आदी खाऊ शकता. यात प्रोटीनसह अन्य पोषक घटकही मुबलक असतात आणि त्यामुळे वजन लवकर वाढतं, असं डॉ. मुटरेजा यांनी सांगितलं.

अशा प्रकारचा आहार घेऊनही वजन वाढत नसल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, असंही डॉ. मुटरेजा यांनी स्पष्ट केलं.

First published: