• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Interesting! सोशल मीडियात खाण्याचे फोटो पोस्ट केल्यामुळे वाढतं वजन, वाचा निरीक्षणं

Interesting! सोशल मीडियात खाण्याचे फोटो पोस्ट केल्यामुळे वाढतं वजन, वाचा निरीक्षणं

कुठलाही पदार्थ खाण्यापूर्वी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यामुळे (Weight gain due to upload food photo on social media) आपलं वजन वाढत असल्याचा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आला आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 19 ऑक्टोबर : कुठलाही पदार्थ खाण्यापूर्वी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यामुळे (Weight gain due to upload food photo on social media) आपलं वजन वाढत असल्याचा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. त्यामुळे तुम्ही जर वारंवार पदार्थांचे फोटो (Beware of posting food photos on social media) काढून सोशल मीडियावर अपलोड करत असाल, तर सावधान. पदार्थांचे फोटो काढणं आणि वजन वाढणं यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, हेदेखील या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. यामुळं वाढतं वजन अमेरिकेतील जॉर्जिया नॉर्दर्न विद्यापीठानं हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. यातील निष्कर्षानुसार एखाद्या पदार्थाचा फोटो काढल्यानंतर तो पदार्थ अधिकाधिक खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे त्या पदार्थाने लवकर पोट भरल्याची भावना निर्माण होत नाही. हा देखील एक इमोशनल इंटिंगचाच प्रकार असून त्यामुळे व्यक्ती तो पदार्थ अधिक वेळा खाण्याची शक्यता निर्माण होते. फोटो काढणाऱ्यांना इशारा आपल्या खाण्याचे फोटो काढून फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांना शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे. अशा प्रकारांमुळे तुमच्या पोटाचा आणि कंबरेला घेर वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वारंवार आपण खाणार असलेल्या पदार्थांचे फोटो काढू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. हे वाचा- काय ही विचित्र अट! इथं राहायचंय तर 'या' वेळेला अंघोळ करायला सक्त मनाई असा काढला निष्कर्ष एकूण 145 तरुणांवर एक प्रयोग करण्यात आला. या मुलांना दोन गटांत विभागण्यात आलं. दोन्ही गटांना पनीर क्रॅकर्स खाण्यासाठी देण्यात आले. त्यातील एका गटाला ते खाण्यापूर्वी त्याचा फोटो काढायला सांगण्यात आला, तर दुसऱ्या गटाला ते थेट खायला देण्यात आले. पहिल्या गटातील तरुणांनी दुसऱ्या गटातील तरुणांपेक्षा सरासरी अधिक प्लेट मागितल्या आणि अधिक सेवन केल्याचं दिसून आलं. फोटो काढल्यामुळं त्या पदार्थाबाबतची लालसा अधिक वाढत असल्याचं या प्रयोगात दिसून आलं.
  Published by:desk news
  First published: