मुंबई, 30 मार्च : आजच्या धावपळीच्या काळातील अनियमित जीवशैलीमुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवत असतात. लठ्ठपणा ही एक अशीच समस्या आहे. बेशिस्त दिनक्रम आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. सर्व वयोगटातील लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. लठ्ठपणामुळे अनेक आजार देखील उद्भवतात. या लठ्ठपणाची अनेक कारणे असू शकतात. परंतु नॉनव्हेज खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो का? असा प्रश्न कधी कधी आपल्या मानात उपस्थित होतो. काही लोकांना हे सत्य वाटते, तर काही लोकांना यावर विश्वास नसतो. तुम्हाला हा प्रश्न पडला असले तरत आज तुम्हाला त्याचे उत्तर मिळणार आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला याबाबत करण्यात आलेले संशोधन आणि अभ्यास काय सांगतात याची माहिती देणार आहोत.
अभ्यासातून काय आले समोर?
PETA च्या रिपोर्टनुसार अॅनिमल बेस्ड प्रोडक्ट्समध्ये प्लांट बेस्ड फूडपेक्षा जास्त चरबी असते. त्यामुळे अधिक काळ वजन नियंत्रित ठेवण्यासाठी शाकाहारी पदार्थ खावे. रिपोर्टनुसार मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण शाकाहारी लोकांपेक्षा 3 पट जास्त आहे असे अभ्यासातून दिसून आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शाकाहार घेणारा लोकांचे वजन मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा 4 ते 8 किलोने कमी असते. या रिपोर्टनुसार शाकाहाराचा अवलंब केल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास मदत तर होतेच, शिवाय शाकाहारामुळे हृदयविकार, मधुमेह, संधिवात आणि कॅन्सर यांसारख्या विविध आजारांशी लढण्यासही मदत होते.
Overthinking : वारंवार एकच विचार करणं असू शकतं आजाराचं लक्षण, मेंदूवर होतो परिणाम
काय असू शकते लठ्ठपणाचे प्रमुख कारण?
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (CDC) रिपोर्टनुसार एखाद्या व्यक्तीचे वजन त्याच्या उंचीनुसार जेवढे असावे त्यापेक्षा अधिक वाढले तर लठ्ठपणा येऊ शकतो. लठ्ठपणाचा परिणाम मुलांसोबत तसेच प्रौढांवर देखील होतो. लठ्ठपणा वाढण्यास आपली आहार शैली, शारीरिक हालचालींचे प्रमाण आणि झोपेचे बिघडलेले चक्र यासह अनेक गोष्टी जबाबदार असू शकतात.
तसेच काही वेळा आनुवंशिकतेमुळे देखील लट्ठपणा येऊ शकतो. याशिवाय काही औषधे घेतल्यानेही लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी संतुलित आहार आणि दररोज आवश्यक प्रमाणात शारीरिक हालचाली आवश्यक असतात. एकंदरीतच चांगली आणि शिस्तबद्ध जीवनशैली असेल तर वजन नियंत्रीत ठेवता येऊ शकते.
स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त का? अशाप्रकारे घ्या काळजी
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight gain, Weight loss tips