दोन मित्रांनी निवडुंगापासून बनवलं 'वेगन लेदर', फॅशन उद्योगात झाला बोलबाला

दोन मित्रांनी निवडुंगापासून बनवलं 'वेगन लेदर', फॅशन उद्योगात झाला बोलबाला

मेक्सिकोच्या दोन मित्रांनी निवडुंगापासून चामडं तयार केलं आहे. याला त्यांनी नाव दिलंय, वेगन लेदर. ऑर्गॅनिक लेदर बनवल्यामुळे या दोघांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

  • Share this:

मुंबई, 25 फेब्रुवारी : आपण चामड्याचे बूट, बेल्ट, पर्स वापरतो तेव्हा या चामड्यासाठी किती जनावरांचे प्राण जातात त्याची कल्पनाही येत नाही. एका आकडेवारीनुसार, चामड्याची उत्पादनं बनवण्यासाठी 100 जनावरांना आपले प्राण द्यावे लागतात. आता मात्र मेक्सिकोच्या दोन मित्रांनी यावर उपाय काढला आहे. या दोघांनी निवडुंगापासून चामडं तयार केलं आहे. याला त्यांनी नाव दिलंय, वेगन लेदर. ऑर्गॅनिक लेदर बनवल्यामुळे या दोघांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. या मित्रांचं नाव आहे अँड्रियन लोपेज वेलार्दे आणि मार्टे कजारेज. हे दोघंही नवे उद्योजक आहेत. त्यांनी बनवलेल्या लेदरचं वैशिष्ट्य म्हणजे या चामड्याचं जैविक विघटनही होतं. फॅशन उद्योगातही या वेगन लेदरचा बोलबाला झालाय.

नोकरी सोडून संशोधन

वेगन लेदर 10 वर्षं टिकू शकतं. त्याचबरोबर या निवडुंगाच्या चामड्याच्या पर्यायामुळे जनावरांच्या कातडीसाठी त्यांचा बळी घ्यावा लागणार नाही. अँड्रियन आणि मार्टे यांनी हा बिझनेस सुरू करण्यापूर्वी नोकरी सोडली होती. वेगन न्यूज नावाच्या एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, निवडुंगाचं चामडं बनवण्यासाठीच्या संशोधनात 2 वर्षं लागली. हे लेदर एकदम असली चामड्यासारखंच दिसतं. तसंच यापासून बनवलेल्या बॅगांचा दर्जाही चांगला असतो.

(हेही वाचा : 50 % बंपर सूट : परदेशी जाण्याचा प्लॅन असेल तर इथे बुक करा तिकीट)

अननसाचंही लेदर

इटलीमध्ये मिलानमध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय फॅशन शो मध्ये या वेगन लेदरचा बराच बोलबाला झाला. त्याचबरोबर H&M ने अननसाच्या झुडपांपासून बनवलेलं लेदरही खूप गाजलं होतं. अमेरिकेतलं अॅरिझोना, मेक्सिकोचं वाळवंट या भागांत मोठ्या प्रमाणात निवडुंग आढळतो. असा निवडुंग हे लेदर बनवण्यासाठी उत्तम मानला जातो.

============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 07:15 PM IST

ताज्या बातम्या