मुंबई, 8 डिसेंबर : लग्न, वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये जाताना आपण एखादं गिफ्ट घेऊन जातो. पण, कार्यक्रमाला योग्य असं गिफ्ट शोधणं हे एक मोठं आव्हान असतं. गिफ्टच्या शोधात गूगल सर्च करुन अनेक वेबसाईट आपण शोधतो. त्यामधील काही वस्तू आवडत नाहीत तर काही बजेटच्या बाहेर असतात. मुंबईकरांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला एका गिफ्ट होऊसची माहिती देणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला गिफ्टसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कोणत्या वस्तू मिळतात?
संस्कृती कलादर्पण असं या गिफ्ट हाऊसचं नाव आहे. या गिफ्ट हाऊसमध्ये विविध धातू, लाकूड, रेझीन यापासून बनवलेले आकर्षक गिफ्ट्स उपलब्ध आहेत. पितळीच्या टांगत्या समया, देवाच्या मूर्ती, समया, फ्लॉवर पॉट्स, स्पिरिच्यूअल बेल्स, ड्रिम कॅचर, लाकडी मुर्त्या, लाकूड व ब्रासचे टेबल्स, कटलरी ड्रॉवर्स हे पर्यायही तुम्हाला उपलब्ध आहेत.
देवांच्या दुर्मीळ मूर्ती
गंगा, गोदावरी, भगवान शंकर, गणपती, बालाजी, बाल गणेश, बालकृष्ण, राधाकृष्ण, नटराज, बुद्ध, येशू ख्रिस्त यांच्या दुर्मिळ आसनातील आणि विविध आकारांच्या मूर्ती या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर भिंतीला लावण्यासाठी वॉल पीस, रेझीन वॉल पीस, धाग्याने बनवलेले पेंटिंग्स हे देखील गिफ्ट म्हणून तुम्ही खरेदी करू शकता.
घर सजावटीसाठी आकर्षक पर्याय, मुंबईतील बाजारात मिळतात वेताच्या वस्तू, Video
गिफ्टसह घरातील होम डेकोरेशनसाठी आवश्यक असलेलं साहित्यही इथं मिळतं. सोने, चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे दागिन्यांपेक्षा धातूचे स्मरणात राहतील असे भेट वस्तू देणं लोकं पसंत करतात. 100 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंतचे गिफ्ट्स आमच्याकडे मिळतात. असं दुकान मालकांनी सांगितलं.
ब्रास, लोखंड, तांबे आणि लाकडापासून तयार केलेल्या आकर्षक भेटवस्तु गुजरात, राजस्थान तसेच देशातीच विविध भागातून मागवल्या जातात.
Christmas 2022 : फक्त 50 रुपयांपासून करा ख्रिसमची भन्नाट शॉपिंग, Video
गुगल मॅपवरून साभार
कुठं मिळतील गिफ्ट्स?
संस्कृती कलादर्पण, सम्राट सी. एच. एस. महात्मा फुले रोड, नौपाडा, ठाणे (प),400602
मोबाईल नंबर : 7021300419
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.