मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शारीरिक हालचाल न करताही अशक्तपणा, थकवा; दुर्लक्ष करणं पडेल महागात

शारीरिक हालचाल न करताही अशक्तपणा, थकवा; दुर्लक्ष करणं पडेल महागात

अशक्तपणा, थकवा अॅनिमियाशिवाय आणखी एका आजाराची लक्षणं आहेत.

अशक्तपणा, थकवा अॅनिमियाशिवाय आणखी एका आजाराची लक्षणं आहेत.

अशक्तपणा, थकवा अॅनिमियाशिवाय आणखी एका आजाराची लक्षणं आहेत.

  • myupchar
  • Last Updated :

सामान्यत: प्रत्येकाला कधीकधी थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. मात्र फारशी शारीरिक हालचाल न करताही एखाद्या व्यक्तीला थकवा जाणवत असेल तर मायस्थेनिया ग्रॅव्हिस असू शकतो. ज्यामुळे मज्जातंतूपासून स्नायूंपर्यंत संक्रमणास वाव मिळतो. यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि त्वरित थकवा जाणवतो.

जेव्हा शरीराची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती मेंदूच्या तंत्रिका कोशिका आणि स्नायू यांच्या दरम्यान निरोगी पेशींवर हल्ला करते तेव्हा मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा आजार उद्भवतो. मायस्थेनिया ग्रॅव्हिस असलेल्या रूग्णाच्या रक्तामध्ये एसिटिल कोलिन रिसेप्टर नावाच्या रासायनिक घटकाचा अभाव निर्माण होतो, जो शरीराच्या स्नायूंना ऊर्जा देण्याचं कार्य करतो. त्याच्या कमतरतेमुळे, स्नायू सुस्त होतात ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. या आजाराचं मुख्य कारण म्हणजे थायमस ग्रंथी. ही छातीच्या आत असलेली विशेष ग्रंथी, हृदयाच्या बाह्य पृष्ठभागावर असते. या थायमस ग्रंथीतील रोगाची गाठ या ग्रंथीच्या आकारात मोठ्या प्रमाणात वाढ करते. या ग्रंथीची वाढ 90 टक्के रुग्णांना जबाबदार आहे.

मायस्थेनिया ग्रॅव्हिसची लक्षणं

सुरुवातीला मायस्थेनिया ग्रॅव्हिस डोळ्याच्या हालचाली, चेहऱ्या वरील अभिव्यक्ती, चघळणे आणि गिळणे नियंत्रित करणाऱ्या स्नायूंवर परिणाम करतं. स्थिती जसजशी वाढत जाते तसतसं मानेच्या स्नायूंवरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे डोकं वर करताना, पायऱ्या चढताना आणि हात वर करण्यात अडचण येते. जर यावर वेळेत उपचार केले गेले नाहीत तर यामुळे श्वास घेण्यासदेखील त्रास होऊ शकतो.

myupchar.comचे डॉ. आयुष पांडे सांगतात की, मायस्थेनिया ग्रॅव्हिसच्या काही लक्षणांमध्ये कमकुवत स्नायू, विश्रांतीनंतरही अशक्तपणा, शारीरिक हालचालीनंतर तब्येत खालावणं, डोळ्यांची समस्या, पापण्यांवर नियंत्रण न राहणं यांचा समावेश आहे. याशिवाय बोलताना, खाताना, गिळताना आणि श्वास घेतानाही त्रास होऊ शकतो.

मायस्थेनिया ग्रॅव्हिस कोणत्याही वयात उद्भवू शकतो. 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांवर पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त परिणाम होतो. तर पन्नाशीनंतर स्त्रियांपेक्षा पुरुषांना  जास्त त्रास होतो. 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मायस्थेनिया ग्रॅव्हिस असणं अगदी सामान्य गोष्ट आहे. ही स्थिती सामान्यत: अनुवांशिक नाही तरी मधुमेहसारखा इतर आजार असलेल्यांना याचा धोका असतो.

निदान आणि उपचाराची ही आहे पद्धत

एखाद्या व्यक्तीची शारीरिक तपासणी केल्यावर आणि त्याच्या वैद्यकीय इतिहासामध्ये अशक्तपणाचा एक प्रकार दिसून आला जो मायस्टॅनिया ग्रॅव्हिस असल्याची शक्यता असेल, तर थायमसची तपासणी करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या, इलेक्ट्रोमोग्राफी, टेन्सिलॉन चाचण्यांसह निदानाची पुष्टी करण्यासाठी काही इतर चाचण्या केल्या जातात. छातीचा सीटी स्कॅन केला जातो. मायस्थेनिया ग्रॅव्हिसवर उपचार केल्यास त्याची चिन्हं आणि लक्षणं दूर होऊ शकतात. वास्तविक याचा प्रभावी उपचार शस्त्रक्रिया आहे. या मदतीनं वाढलेली थायमस ग्रंथी शरीरातून काढली जाते. हे देखील प्रभावी आहे, कारण हे रोग हळूहळू बरे करण्यास सुरुवात करतं आणि थायमस ग्रंथीच्या मोठ्या गाठी मुळे होणाऱ्या कर्करोगाची शक्यता देखील कमी करते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – मायास्थेनिया ग्रॅव्हिस: लक्षणे …

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

First published:

Tags: Health