• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • स्मरणशक्ती कमकुवत करतात या 5 गोष्टी; तुमच्याही आहारात असतात का?

स्मरणशक्ती कमकुवत करतात या 5 गोष्टी; तुमच्याही आहारात असतात का?

तुमचा आहार योग्य नसेल तर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्या तुम्हाला घेरतील. आजकाल बहुतेक लोकांना लहान वयातच मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब, तणाव आदी आजार होतात. याचं एक कारण त्यांचा चुकीचा आहार हेदेखील आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : स्मरणशक्तीचा (Memory) संबंध वयाशी आहे असं मानलं जातं. असं म्हणतात की, वय वाढलं की स्मरणशक्ती कमी होऊ लागते. पण तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही वयोवृद्ध माणसेही पाहिली असतील, ज्यांच्या वयाचा त्यांच्या स्मरणशक्तीवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि म्हातारपणातही त्यांची स्मरणशक्ती चांगली राहिली आहे. हा सर्व त्यांच्या चांगल्या आहार आणि दिनचर्येचा परिणाम आहे. सर्व संशोधनातून असं दिसून आलंय की अन्नाचा केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर, आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम (memory and right diet) होतो. तुमचा आहार योग्य नसेल तर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्या तुम्हाला घेरतील. आजकाल बहुतेक लोकांना लहान वयातच मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब, तणाव आदी आजार होतात. याचं एक कारण त्यांचा चुकीचा आहार हेदेखील आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत, ज्या शरीरासोबतच मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत वाईट मानल्या जातात. त्यांच्या सेवनामुळे राग, चिडचिडेपणा, तणाव वाढतो आणि स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. स्निग्ध अन्न (Greasy food) जास्त स्निग्ध किंवा तेलकट-तळकट पदार्थ चवीला स्वादिष्ट असतात. परंतु ते आरोग्यासाठी चांगले नसतात. जास्त तळलेलं अन्न तुमच्या चेतापेशींचे नुकसान करतं आणि मेंदूची क्षमता कमी करतं. याचा थेट परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळं शक्यतो साधं आणि पचणारं अन्न खाण्याची सवय लावा. जंक फूड (Junk food) जंक फूडमध्ये चव वाढवण्यासाठी अशा काही गोष्टींचा वापर केला जातो. ज्यामुळं डोपामाइन हार्मोन्सच्या उत्पादनावर परिणाम होतो. ते जास्त खाल्ल्यानं व्यक्तीमध्ये तणावाची पातळी वाढते. त्याची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. दारू (Alcohol) दारू पिण्याची सवय तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. यामुळं तुमच्या शरीरात अनेक घातक रोग होतात. तसंच, मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. ते प्यायल्यानं व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू लागतं. स्मरणशक्ती कमकुवत होते आणि साध्या गोष्टीही विसरण्याची समस्या वाढते. हे वाचा - गजब कहानी! 8 वर्ष Dating करूनही बॉयफ्रेंडनं प्रपोज केलं नाही, गर्लफ्रेंडनं ठोकला कोर्टात दावा गोड (Sweet) मिठाई खाण्याचे शौकीन असलेल्या लोकांनीदेखील काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त साखर खाल्ल्यानं मेंदूवरही परिणाम होतो. यामुळं मन सुस्त होतं आणि आपलं काम आपण नीट करू शकत नाही. यामुळं व्यक्तीची स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. हे वाचा - Happy Birthday Ananya Panday: वयाच्या 23 व्या वर्षीचं अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण ट्रान्स फॅट ट्रान्स फॅटचं जास्त प्रमाण तुमच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करतं. यामुळं स्मरणशक्तीवर ताण येतो आणि व्यक्तीला अल्झायमर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळं ज्या गोष्टींमध्ये ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात आढळतं, अशा गोष्टी टाळा.
  Published by:News18 Desk
  First published: