Home /News /lifestyle /

या वर्षापर्यंत कोरोनाव्हायरससह जगावं लागेल; शास्त्रज्ञांनी वर्तवली शक्यता

या वर्षापर्यंत कोरोनाव्हायरससह जगावं लागेल; शास्त्रज्ञांनी वर्तवली शक्यता

लसीशिवायच आपण कोरोनाव्हायरसह जगायला शिकू असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 20 जून : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसवरील लस (coronavirus vaccine) विकसित करण्यासाठी जुटलेत. सर्वांनाच ही लस कधी येईल याची प्रतीक्षा आहे. काही लसींच्या चाचण्यांचे सकारात्मक परिणाम येत असल्याचं दिसलं आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत लस येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, 2021 पर्यंत कोरोनावर कोणतीही प्रभावी लस येणार नाही, तोपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ कोरोनाव्हायरसह जगावं लागेल. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार,गेल्या सहा महिन्यांत जगभरात कोरोनाव्हायरसचं संक्रमण इतकं वाढलं आहे की सध्या तरी व्हायरस माणसांसमोर जिंकत आहे. यानंतर वर्षाच्या अखेरपर्यंत प्रभावी लस बाजारात येईल, असं सांगितलं जातं आहे. याचा अर्थ कोरोनाची लस आल्यानंतर ती जगभरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत कोरोनाव्हायरस जगावं लागेल, असं तज्ज्ञ म्हणालेत. ड्युक युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर कॅमरॉन वुल्फ म्हणाले, "लोकं या आजाराला हलकं घेत आहेत. जगभरातील लोकांना वाटतं की कोरोनाचा काही कालावधीत आपोआपच नष्ट होईल, मात्र तसं नाही" हे वाचा - भारतात कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार 'हे' औषध; शरीरात व्हायरसचं संक्रमण रोखणार आताची वेळ कोरोनाव्हायरसची क्षमता कमजोर करण्यासाठी, त्यादृष्टिने आपली रणनीती आखण्याासठी आणि आपली ताकद वाढवण्यासाठी योग्य आहे. कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीतील पुढील टप्पा  आपल्याला आशा कमी करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि आपल्या व्यवहारात बदल करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हे वाचा - राज्यात आज दिवसभरात पुन्हा वाढले 3827 रुग्ण; नवा उच्चांक शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाव्हायरसचे 86 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 4 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतात सध्या कोरोनाचे 3,80,532 रुग्ण आहेत. 1 लाख 63 हजार 248 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा हा 2 लाख 04 हजार 711 झाला आहे. सक्रीय रुग्ण आणि निरोगी रुग्ण यांच्यातील फरक दिवसेंदिवस वाढत आहे की भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. सध्या यांच्यात तब्बल 41 हजार 462चा फरक आहे. तर आतापर्यंत 12 हजार 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - कोरोनाच्या लढ्यात व्यापाऱ्याचं योगदान; कोरोनाग्रस्तांसाठी दिली 19 मजली इमारत
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus disease

    पुढील बातम्या