Home /News /lifestyle /

'आम्हाला क्षमा करा, घोळ घातला आम्ही', Women's Day ला Flipkart ने महिलांची का मागितली माफी?

'आम्हाला क्षमा करा, घोळ घातला आम्ही', Women's Day ला Flipkart ने महिलांची का मागितली माफी?

Flipkart apology for women's day sms : सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात असताना फ्लिपकार्टने मात्र या दिवशी महिलांची माफी मागणारं ट्वीट केलं.

    मुंबई, 09 मार्च : 8 मार्चला महिला दिन साजरा (International Women's Day) झाला. सोशल मीडियावर महिला दिनांच्या शुभेच्छांचे बरेच मेसेज आले. पण याच दिवशी फ्लिपकार्टने (Flipkart women's day sms) मात्र महिलांसाठी माफी मागणारं ट्विट केलं. महिला दिनी फ्लिपकार्टने अशी चूक केली, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर जाहीर माफी मागण्याची वेळ ओढावली (Flipkarts apology for womens-day sms). फ्लिपकार्टने असं नेमकं केलं तरी काय? महिला दिनी इतर सर्वांप्रमाणे फ्लिपकार्टने महिलांना शुभेच्छा दिल्या. पण त्यांनी यादिवशी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हाच प्रयत्न त्यांना भारी पडला. महिला दिनादिवशीच फ्लिपकार्टने माफी मागणारं ट्विट केलं. "आम्ही घोळ घातला आणि यासाठी आम्ही माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. महिला दिनी आम्ही पाठवलेल्या मेसेजसाठी आम्ही माफी मागतो". असं ट्वीट फ्लिपकार्टने केलं आहे. आता फ्लिपकार्टने महिला दिनी असा नेमका काय मेसेज केला होता, ज्यामुळे कंपनीला असं ट्विट करावं लागलं. हे वाचा - ऑन कॅमेरा फक्त खाऊन महिन्यालाच 7 कोटी कमावते; असं काय आहे हिच्या VIDEOमध्ये पाहा फ्लिपकार्टने महिला दिनानिमित्त महिलांसाठी काही खास ऑफर दिल्या. महिला दिनाच्या आदल्या दिवशीपासून  मोबाईलवर त्याचे काही प्रमोशनल एसएमएस पाठवले. या मेसेजवरून फ्लिपकार्टवर टिकेची झोड उठली. सोशल मीडियावर फ्लिपकार्टविरोधात मेसेज येऊ लागले. फ्लिपकार्टचा हा मेसेज एका ट्विटर युझरने ट्विटरवर शेअर केला, तुम्हाला इथं काय समस्या आहे ते दिसतं आहे का? असं या ट्विटमध्ये विचारण्यात आलं. या मेसेजमध्ये फ्लिपकार्टने म्हटलं, प्रिय ग्राहक, चला हा महिला दिन साजरा करू. 299 रुपयांपासून किचन अप्लायेन्स उपलब्ध. हा मेसेज मोबाईलवर येताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्वयंपाकघर हे महिलांसाठीच आहे, असाच लैंगिक भेदभाव करणारा संदेश या मेसेजमधून दिला जात असल्याचा आरोप महिलांनी केला. यावर रिप्लाय करताना एका युझरसने असं अप्लायन्स, मेकअप आणि पिंक प्रोडक्टबाबतही केलं जात असल्याची प्रतिक्रिया दिली. आपण महिला सशक्तीकरणाबाबत बोलतो. पण अद्यापही महिला स्वयंपाकघरापुरतीचं मर्यादित आहे, याच समजुतीत जगत आहोत. असं आणखी एका युझरने म्हटलं आहे. फ्लिपकार्टचे अशा आणखी काही एसएमएसचा स्किनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. हे वाचा - 'या' गोष्टीवर महिलांना मोकळेपणानं बोलण्याची वाटते भीती हे ट्विट इतके व्हायरल झालं की अखेर फ्लिपकार्टला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागली आणि सोशल मीडियावर ट्विटर करत माफी मागावी लागली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Flipkart, International women's day, Woman

    पुढील बातम्या