मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Superfood : काय सांगता ! मिठाईमधूनही मिळू शकते भरपूर प्रोटीन ?

Superfood : काय सांगता ! मिठाईमधूनही मिळू शकते भरपूर प्रोटीन ?

आपल्याकडे अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गोड पदार्थांचे शौकीन असतात. सणवार असो किंवा एखादी (Sweets Rich In Protein) आनंदाची बातमी सांगायची असो. आपल्याकडे गोड झाल्याशिवाय आनंद पूर्ण होत नाही.

आपल्याकडे अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गोड पदार्थांचे शौकीन असतात. सणवार असो किंवा एखादी (Sweets Rich In Protein) आनंदाची बातमी सांगायची असो. आपल्याकडे गोड झाल्याशिवाय आनंद पूर्ण होत नाही.

आपल्याकडे अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गोड पदार्थांचे शौकीन असतात. सणवार असो किंवा एखादी (Sweets Rich In Protein) आनंदाची बातमी सांगायची असो. आपल्याकडे गोड झाल्याशिवाय आनंद पूर्ण होत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 26 मार्च : गोड खायला जवळपास सर्वानाच आवडतं. त्यात आपल्याला गोडाने काही त्रास होत नसेल किंवा कोणताही आजार नसेल. मग तर आपण अगदी मनसोक्तपणे गोड खातो. आपल्याकडे अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गोड पदार्थांचे शौकीन असतात. सणवार असो किंवा एखादी आनंदाची बातमी सांगायची असो. आपल्याकडे गोड झाल्याशिवाय आनंद पूर्ण होत नाही. गोड खाल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर अनेकदा बोललं जात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही गोड पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे खाल्यामुळे तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासणार नाही (Sweets Rich In Protein). म्हणजेच तुम्हाला त्याचा फायदा होईल.

रात्री फास्ट फूड खाल्ल्यानं आरोग्यावर होतो गंभीर परिणाम? अजिबात खाऊ नका 'हे' पदार्थ

व्हेजिटेरियन म्हणजेच मांस न खाणाऱ्या लोकांना प्रोटीनची वेगवगेळे पर्याय शोधावे लागतात (Protein Rich Sweets For Vegetarians). तर आज त्यांच्यासाठी आम्ही खास पदार्थ घेऊन आलो आहोत जे तुमची प्रोटीनची कमतरता भरून काढण्यास तुम्हाला मदत करतील. आपल्या घरात आपण मुगडाळ नेहमीच खातो. याच मूगडाळीचा हलवा करून खाल्यास यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळते. त्याचबरोबर मूगडाळीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हाय ब्लडप्रेशरचा रुग्णांसाठी फायदेशीर असते. त्याचबरोबर बेसनाचे लाडूदेखील प्रोटीनने भरपूर असतात. यामध्ये फॉलीक ऍसिडदेखील असते. जे आपल्या शरीरात व्हाईट ब्लड सेल्स आणि रेड ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करते.

दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. यातच दुधापासून बनलेल्या मिठाया फायदेशीर असतात. दुधाची खीर, फाटलेल्या दुधापासून बनवलेली मिठाई हे पर्याय आहेत. दुधाची खीर बनवताना त्यामध्ये साखरेऐवजी गूळ आणि सुका मेवा टाकावा. यामुळे ती खीर अधिक पौष्टिक बनते. त्याचप्रमाणे तुम्ही दही आणि ताकदेखील घेऊ शकता. यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल आणि तुमची एनर्जी जास्त काळ टिकून राहण्यास मदत होईल. मात्र कोणत्याही गोड पदार्थांचे सेवन कायम प्रमाणातच करावे आणि आपल्याला एखादा त्रास किंवा आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणताही पदार्थ खावा.

जर AC शिवाय जमत नसेल तर सावधान! थंडा थंडा कूलच्या नादात कुटुंबही येईल धोक्यात

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Superfood