Home /News /lifestyle /

Upper Lips चे व्हॅक्सिंग करावं की थ्रेडिंग; काय आहे दोन्हीचे फायदे-तोटे?

Upper Lips चे व्हॅक्सिंग करावं की थ्रेडिंग; काय आहे दोन्हीचे फायदे-तोटे?

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी (Beauty Tips) मुलींना ओठाच्या वरचे केस काढायला आवडतात. यासाठी दोन पद्धती अगदी सामान्य आहेत. पहिली पद्धत म्हणजे थ्रेडिंग आणि दुसरी पद्धत म्हणजे वॅक्सिंग.

  मुंबई, 01 जुलै : ओठांच्या वरच्या भागावरील केस म्हणजेच अप्पर लिप्स (Upper Lips) करण्यासाठी कोणती पद्धत (Upper Lip Hair Removing Method) योग्य आहे. असा प्रश्न सामान्यपणे सर्वच मुलींना पडतो. यासाठी मुली एकत्र थ्रेडिंग (Threading) करतात किंवा वॅक्सिंग (Waxing). पण या दोन्हींपैकी कोणती पद्धत त्यांच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला यासाठी कोणती पद्धत अधिक सुरक्षित (Safe Methods) असू शकते याबद्दल माहिती देणार आहोत. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी (Beauty Tips) मुलींना ओठाच्या वरचे केस काढायला आवडतात. यासाठी दोन पद्धती अगदी सामान्य आहेत. पहिली पद्धत म्हणजे थ्रेडिंग आणि दुसरी पद्धत म्हणजे वॅक्सिंग. थ्रेडिंगसाठी थ्रेडच्या मदतीने केस काढले जातात, तर वॅक्सिंगमध्ये गरम मेण त्वचेवर लावून केस काढले जातात. बरेच लोक थ्रेडिंगला त्वचेसाठी एक चांगला मार्ग मानतात, तर बरेच लोक वॅक्सिंगचा विचार करतात. थ्रेडिंग थ्रेडिंगमध्ये ओठांच्या वरच्या भागावरील केस धाग्याच्या मदतीने काढले जातात. थ्रेडिंग करताना त्वचा घट्ट ओढून घट्ट ठेवावी लागते. जर आपण त्याच्या फायद्यांबद्दल बोललो, तर प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी हा सर्वोत्तम मार्ग म्हणता येईल. ज्यामध्ये त्वचेच्या वरच्या थराला इजा होत नाही. त्यामुळे वाढलेल्या केसांची समस्या देखील होत नाही. परंतु जर आपण नुकसानाबद्दल बोललो तर थ्रेडिंग प्रक्रिया वेदनादायक असते आणि काही दिवसांनी केस पुन्हा वाढतात. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर थ्रेडींगदरम्यान त्वचा घट्ट पकडून न ठेवल्यास त्वचा चिरण्याची शक्यता असते. हे करण्यासाठी अधिक वेळ लागतो.

  Rain Driving Tips : पावसाळ्यात ड्रायव्हिंग करणं अवघड; दुर्घटना टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

  व्हॅक्सिंग वास्तविक जेव्हा ओठांची त्वचा मेण लावून घट्ट केली जाते, तेव्हा असे केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचा जळू शकते आणि पुरळ आणि लालसरपणा देखील होऊ शकतो. थ्रेडिंगच्या तुलनेत वॅक्सिंग त्वचेमध्ये शोषले जाते आणि त्वचा अधिक संवेदनशील बनते. जर आपण त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल बोललो. तर मेण गरम केल्यामुळे, त्वचा जळण्याची शक्यता जास्त असते. वॅक्सिंगमुळे पट्टीसह त्वचेचा वरचा थर देखील काढून टाकला जातो, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि त्वचा खूप संवेदनशील बनते. यामुळेच जास्त वॅक्सिंग केल्याने त्वचा काळी पडते. जर तुम्ही वारंवार वॅक्सिंग करत असाल तर ओठांजवळील त्वचा सैल होऊ लागते आणि सुरकुत्या येऊ लागतात. Sunflower Seeds : सूर्यफुलाचं फक्त तेलच नव्हे तर बियाही जरूर खा; आहेत इतके आश्चर्यकारक फायदे कोणते तंत्रज्ञान आहे अधिक चांगले ? या दोन्हींच्या प्रक्रियेकडे पाहता, असे म्हणता येईल की वॅक्सिंगपेक्षा थ्रेडिंग ही प्रक्रिया हळू असली तरी त्यामुळे त्वचेचे कमी नुकसान होते. जर थ्रेडिंग काळजीपूर्वक केले तर त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे अप्पर लिप्ससाठी थ्रेडिंगचा अधिक वापर करणे चांगले.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Beauty tips, Lifestyle, Skin care

  पुढील बातम्या