S M L

पाणी प्या, सशक्त राहा

शरीरातील तापमानाचं संतुलन राखण्यासाठी फक्त थंड पेयच नव्हे तर पाणीही पिणं तितकंच गरजेचं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 26, 2017 04:27 PM IST

पाणी प्या, सशक्त राहा

26 एप्रिल : उन्हाळ्यात वाढत्या  उष्णतेपासून सुटका व्हावी यासाठी आपण निरनिराळे घरगुती उपाय शोधायला  सुरुवात करतो. मात्र शरीरातील तापमानाचं संतुलन राखण्यासाठी फक्त थंड पेयच नव्हे तर पाणीही पिणं तितकंच गरजेचं आहे. उन्हाळ्यात भरपूर पाणी न प्यायल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊयात.

1. डिहाइड्रेशन

उन्हाळ्यात दिवसाला 15 ते 20 ग्लास पाणी पिणं फार गरजेचं आहे. पाणी कमी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आणि त्यामुळेच डिहाइड्रेशनचा त्रास होतो. डिहाइड्रेशनमुळे तहान लागते तसेच तोंड, जीभ आणि ओठ कोरडे पडतात. आणि शरीराचे संतुलन बिघडते.

2. शरीराचे तापमान

शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर शरीरातील तापमान कमी राहतं. जास्त पाणी प्यायलं तर ते निरोगी आरोग्य आणि सतेज त्वचेसाठी उपायकारक ठरेल.

Loading...
Loading...

3. पोटाचे विकार

शरीरात पाण्याचं प्रमाण 98% तर सोडियम बाइकार्बोनेटचं प्रमाण फक्त 2% असतं. ज्यामुळे पचन प्रकिया सुरळीत होते. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असेल तर पोटाचे विकार होतात. तसंच अपचन, छातीत जळजळ यांसारखे आजार होतात. जास्त पाणी पिणं शरीराला फायदेशीर ठरतं.

4. सांधेदुखी

शरीराचा विविध भाग कार्टिलेजच्या मदतीने जोडलेला असतो. त्यामध्ये 80% पाण्याचं प्रमाण असतं.  पाण्याचं प्रमाण जास्त असले तर हाडांवर कोणताही परिणाम होत नाही. तसंच धावताना किंवा कोणताही व्यायाम करताना हाडांना होणारा त्रास कमी होतो.

5. वाढत्या वयात होणारा त्रास

जसजसं वय वाढत जातं,  तसतसं शरीरातील पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. अशा परिस्थितीत थोडं थोडं पाणी पिणं फार गरजेचं आहे. आणि वाढत्या वयात सुद्धा त्वचा सतेज राहण्यास मदत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 04:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close