मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Water For Fitness : सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचून थक्क व्हाल

Water For Fitness : सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचून थक्क व्हाल

Water For Fitness : तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, एक ग्लास पाणीसुद्धा हेल्थ फिट ठेवण्यात विशेष भूमिका बजावू शकतं. तज्ज्ञांच्या मते, सकाळी एक ग्लास कोमट पाणी (lukewarm water) पिणं तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

Water For Fitness : तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, एक ग्लास पाणीसुद्धा हेल्थ फिट ठेवण्यात विशेष भूमिका बजावू शकतं. तज्ज्ञांच्या मते, सकाळी एक ग्लास कोमट पाणी (lukewarm water) पिणं तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

Water For Fitness : तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, एक ग्लास पाणीसुद्धा हेल्थ फिट ठेवण्यात विशेष भूमिका बजावू शकतं. तज्ज्ञांच्या मते, सकाळी एक ग्लास कोमट पाणी (lukewarm water) पिणं तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : आजकालच्या धावपळीच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. फिट राहण्यासाठी अनेकजण व्यायामशाळेत घाम गाळतात तर काही चालणे, धावण्याचा व्यायाम करतात. तसेच योगासने करण्यावरही अनेकांचा भर असतो. पण, तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, एक ग्लास पाणीसुद्धा हेल्थ फिट ठेवण्यात विशेष भूमिका बजावू शकतं. तज्ज्ञांच्या मते, सकाळी एक ग्लास कोमट पाणी (lukewarm water) पिणं तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. सकाळी पाणी पिण्याची नेमकी प्रक्रिया आपण (Water For Fitness) जाणून घेऊया.

सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचून थक्क व्हाल

कोमट पाणी प्यावे

आयुर्वेदिक लेखक आणि तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांच्या मते, फिट राहण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. आपले आरोग्य हे छोट्या छोट्या चांगल्या सवयींवर अवलंबून असते, असे त्यांचे मत आहे. या सवयींमध्ये तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकता.

शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे कमी हिमोग्लोबिन, हाडे कमकुवत होणे अशा सर्व समस्या दूर होतात.

सर्दी आणि खोकल्याचा त्रास नाही

एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. वास्तविक, छातीत श्लेष्मा जमा झाल्यामुळे, श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत या समस्या कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी खूप प्रभावी ठरू शकते.

हे वाचा - Post Office Scheme:दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख; वाचा स्कीमबद्दल सर्वकाही

वजन कमी

रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया मजबूत होते, ज्यामुळे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगात होते आणि अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते.

हे वाचा - आधी जेवण ऑर्डर केलं, मग….; कपलनं अतिशय हुशारीनं हॉटेलमधून लंपास केली करोडो रुपयांची वाईन बॉटल

योग्य रक्ताभिसरण

रक्ताभिसरण योग्य ठेवण्यासाठीही कोमट पाण्याचा फायदा होतो. शरीरात विषारी घटक आणि चरबी जमा झाल्यामुळं रक्ताभिसरण सुरळीत राहू शकत नाही. शरीराच्या सर्व अवयवांसाठी रक्त खूप महत्त्वाचे असते. कोमट पाणी पिण्यानं रक्ताभिसरण अधिक चांगले काम करते. शरीरातील रक्ताभिसरण नीट चालले तर तुम्हाला तंदुरुस्त वाटते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हेतू आहे. मात्र, न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Water