Home /News /lifestyle /

Mission Paani: पाणी वाचवणं ही काळाची गरज; फक्त या 5 गोष्टी केल्यात तर होईल मोठं काम

Mission Paani: पाणी वाचवणं ही काळाची गरज; फक्त या 5 गोष्टी केल्यात तर होईल मोठं काम

जर्मनीमध्ये प्रत्येक व्यक्ती सरासरी 130 लिटर पाण्याच्या वापर करतो. मात्र एका व्यक्तीच्या वापरासाठी उत्पादीत होणाऱ्या वस्तूंचा विचर करता 4,000 लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला लागतं ज्याला व्हर्चुअल वॉटर म्हणतात.

जर्मनीमध्ये प्रत्येक व्यक्ती सरासरी 130 लिटर पाण्याच्या वापर करतो. मात्र एका व्यक्तीच्या वापरासाठी उत्पादीत होणाऱ्या वस्तूंचा विचर करता 4,000 लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला लागतं ज्याला व्हर्चुअल वॉटर म्हणतात.

पाणी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. पण सध्याची भयानक परिस्थिती पाहता लवकरच आपल्याला येणाऱ्या वेळेत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी वेळीच काही उपाययोजना लगेच करणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली , 20 जानेवारी : गेल्या काही काळापासून आपण हे सातत्यानं ऐकत आहोत की, भारत अतिशय झपाट्यानं शून्य दिवसाच्या (Zero Day)जवळ जात आहे. शून्य दिवस म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपल्याकडील नैसर्गिक जलसाठे पूर्णपणे संपलेले असतील. हा भयानक दिवस पहायचा नसेल, तर आपल्याला वेळीच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या देशातील 15 हून अधिक शहरांमध्ये पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे आणि आपण ज्या पद्धतीनं पाण्याचा वापर करत आहोत, त्यावरून आणखी शहरांची त्यात भर पडण्याची शक्यता आहे. आता खरंतर पाण्याचा प्रत्येक थेंब अन, थेंब महत्त्वाचा असून, प्रत्येक व्यक्तीच्या कृती यासाठी जबाबदार ठरणार आहे. आपण आता पाण्याबाबत अतिशय जागरूक होण्याची गरज असून, स्वतःला काही महत्त्वाच्या सवयी लावणे आवश्यक आहे. यामध्ये जल संवर्धन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असेल.  आजपासून अंमलात आणल्या जाव्यात अशा काही सवयींबाबत ही माहिती .... योग्य आहार : गेल्या काही महिन्यांत बाहेरून ऑर्डर करून खाद्यपदार्थ खाणं किंवा बाहेर जाऊन खाणं याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. आहारावर नियंत्रण ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे ही पण शिकलो आहोत तसचं    घरी बनवलेल्या पदार्थांचं महत्त्व आपल्या लक्षात आलं आहे. यामुळं आपला आहार बदलणं आणि नवीन आहार शैली आत्मसात करून घेण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. हा बदल आरोग्यासाठीच नव्हे, तर पणी वाचवण्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. काही ठराविक पिकं आणि मांस यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं. आपण पूर्णान्नाचा तसेच  कमी पाणी लागणाऱ्या अन्न साखळीतील सर्वात खालच्या स्तरावरील पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्याचा पाणी बचतीसाठी उपयोग होईल. तसेच अन्न वाया जाणार नाही, अशा पद्धतीनं योग्य प्रमाणात अन्न शिजवल्यास आपोआप पाण्याची बचत होईल. उपभोक्तावाद कमी केल्यास फायदा : आपण खरेदी करत असलेली प्रत्येक गोष्ट, मग ती  जीन्सच्या जोडी असू द्या किंवा शूजची जोडी त्याच्या निर्मिती प्रक्रियेत, वाहतुकीत पाण्याचा समावेश असतोच. यासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण बघितलं तर ते वेड लावेल इतकं प्रचंड असतं. आपण ऑनलाइन खरेदी केलेल्या जीन्सच्या एका जोडीसाठी सुमारे 10 हजार लिटर पाण्याचा वापर केला जातो. पाणी बचतीचं महत्त्व समजणं ही एक संथ प्रक्रिया आहे; परंतु ती अत्यावश्यक प्रक्रिया आहे. आपली कोणती सवय पाणी बचतीला मदत करेल हे माहित नाही. त्यामुळं खरेदी करताना जाणीवपूर्वक करा आणि पाणी वाचवा. अगदी सोपी गोष्ट आहे ही. यामुळे तुम्ही पैसाही साठवाल आणि पाणीही वाचवाल. विजेचे स्वीच बंद करा : ऊर्जा वापराबाबत जागरूक असणं आणि त्यासाठी घरीही दक्षता बाळगणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, वीज तयार होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. वीजनिर्मिती केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड ऊर्जा (Energy) खर्च करावी लागते. अगदी साध्या सवयींनी वीज पर्यायानं पाणी वाचवण्यास मदत करता येते. उदाहरणार्थ, तुमच्या फोनचं चार्जिंग पूर्ण झालं आहे, मग चार्जर अनप्लग करा. तुम्ही हॉलमध्ये आहात तर विनाकारण सुरू असणारा किचनमधील लाईट बंद करा. तुम्ही शहराबाहेर जात आहात, मग  मुख्य स्विच बंद करा. या छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या विजेचा वापर कमी करण्यास मदत करतात पर्यायानं पाणी वाचविण्यासाठीही महत्त्वाच्या ठरतात. कपडे धुण्याबाबत जागरूक रहा : वॉशिंग मशीनच्या एका  वॉश सायकलसाठी 50 ते 70 लिटर पाण्याची गरज असते. कपडे धुण्यासाठी हे पणी खूप आहे. हातांनी कपडे धुणे सध्याच्या काळात शक्य नसले तरी कपडे धुण्यात पाणी वाचवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. यासाठी एक साधी सवय आत्मसात करा.  वॉशिंगमशीनजवळ लॉन्ड्रीची बॅग ठेवा, आणि ती पूर्ण भरेपर्यंत कपडे धुवायला मशीन वापरू नका. एका वॉश सायकलचा पूर्ण क्षमतेनं वापर करा. यामुळं पाण्याची मोठी बचत होईल. 5 मिनिटंही मोलाची : आपण आंघोळीसाठी शॉवर वापरतो. ही सवय पाण्याची बचत करण्याचा आपला संकल्प कायम ठेवू शकते किंवा तो मोडू शकते. एका शॉवरसाठी 60 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले जाऊ शकते. पाणी वाचवायचं असेल तर सोपा मार्ग म्हणजे 5 मिनिटांची शॉवर सेशन्स घेण्याची सवय लावणे. म्हणजे शॉवर घेताना साबण किंवा शांपू लावताना शॉवर बंद करावा. त्यामुळं पाण्याचा वापर कमी होईल. यावर दुसरा एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे जाणीवपूर्वक बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणे; परंतु हा प्रत्येकाला सोयीचा असू शकत नाही. या सवयी लादणे, याचा आग्रह धरणं सोपं आहे; पण रोजच्या आयुष्यात त्या आत्मसात करणं अवघड आहे.

हे देखील वाचा - पाण्यामार्फतही पसरू शकतो coronavirus; काय सांगतात तज्ज्ञ?

या छोट्या आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृती अखेरीस सवयी बनतील आणि जगाला केवळ ऊर्जा कार्यक्षमच नव्हे, तर पाणी कार्यक्षम बनण्यासही मदत करेल. आम्ही आपणास हार्पिक न्यूज 18  मिशन पानी हा कार्यक्रम बघण्याचीही विनंती करतो. जलसंधारण आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. Https://www.news18.com/mission-paani/ पहा आणि मिशन पानी वॉटरथॉनमध्ये सहभागी व्हा. भारताला पाण्याच्या सुरक्षित, समृद्ध करण्यासाठी आणि पाणी वाचवण्याच्या लढाईत सामील होण्यासाठी शपथ घेत असून, मान्यवर तज्ज्ञांचा आठ तासांचा कार्यक्रम प्रसारित होत आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Water, Water crisis

पुढील बातम्या