Home /News /lifestyle /

पाणी प्यायल्यानेही वाढू शकतं Blood Pressure? संधोधनात समोर आली धक्कादायक माहिती

पाणी प्यायल्यानेही वाढू शकतं Blood Pressure? संधोधनात समोर आली धक्कादायक माहिती

Water cause High Blood Pressure : पाण्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्याही निर्माण होऊ शकते, याबाबत शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे.

मुंबई, 26 जून : पाण्याला जीवन म्हटलं जातं. कारण शरीराला अन्नाप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा जास्त गरज पाण्याची असते. आरोग्याच्या अनेक तक्रारी पुरेसं पाणी प्यायल्यानं दूर होतात. पाणी जसं उत्तम आरोग्याचा स्रोत असतं, तसंच काही वेळेला पाण्यामुळे आजार पसरूही शकतात. कॉलरा, गॅस्ट्रो यांसारखे आजार दूषित पाण्यामुळं होतात, हे आपण ऐकलंच असेल; पण उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्याही पाण्यामुळे निर्माण होऊ शकते. शास्त्रज्ञांनी त्याबाबत संशोधन केलं आहे. पाण्यातली काही रसायनं रक्तदाब वाढवायला कारणीभूत ठरतात (Water cause High Blood Pressure) . काही वेळेला पाण्यातल्या काही रसायनांमुळे हायपरटेन्शन (Hypertension) अर्थात उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो, असं ‘हायपरटेन्शन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मानवनिर्मित रसायनांचं प्रमाण आता वाढतं आहे. त्यामुळे निसर्गातली हवा, पाणी आणि जमीन यांचं प्रदूषण होत आहे. पॉलिफ्ल्युरोकाइल सबस्टन्स आणि पेरफ्ल्युरोकाइल (पीएफएएस) यांसारख्या रसायनांचं सहजपणे विघटन होत नाही. त्यामुळे मध्यमवयीन स्त्रियांमधला उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. म्हणून सर्वांनी स्वच्छ आणि शुद्ध पाण्यासाठी (Pure And Clean Water) व हवेसाठी आग्रही असावं असं तज्ज्ञ सांगतात. या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी 45-56 वयोगटातल्या एक हजार स्त्रियांची निवड केली होती. जवळपास वीस वर्षं या महिलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं. अभ्यासाच्या सुरुवातीला सगळ्या सहभागी महिलांचा रक्तदाब नॉर्मल होता. 2017मध्ये जेव्हा अभ्यासाचा शेवट होणार होता, तेव्हा 470 स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आढळली. ज्या स्त्रियांच्या रक्तात पीएफएएसचं (PFAS) प्रमाण जास्त होतं, त्यांच्यात उच्च रक्तदाबाचा धोका 71 टक्के अधिक होता, असं संशोधकांना दिसलं. हे वाचा - Reduce Excessive Sweating: तुम्हालाही जास्त घाम येण्याचा होतो त्रास? आहारात या 7 गोष्टी न चुकता घ्या सौंदर्यप्रसाधनं (Cosmetics), शाम्पू, शेव्हिंग क्रिम, नॉनस्टिक (Nonstic) भांडी आणि काही घरगुती पदार्थ आदींमध्ये पॉलीफ्ल्युरोकाईल आढळतं. हे रसायन पाण्यासोबत वातावरणात खूप काळ राहू शकतं, असं 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ'मधल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच पाणी शुद्ध करून पिणं हिताचं असतं. रिपोर्टनुसार मिशिगन विद्यापीठातल्या साथरोग आणि पर्यावरण विज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे वरिष्ठ अभ्यासक सूंग क्यून पार्क यांच्या म्हणण्यानुसार, पीएफएएसमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. म्हणून काही देशांनी खाद्यपदार्थांचं पॅकेजिंग आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये पीएफएएसचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. आमच्या निष्कर्षांवरून हे स्पष्ट होतंय, की उत्पादनांमध्ये पीएफएएसचा वापर मर्यादित ठेवल्यामुळे हायपरटेन्शनचा धोका कमी केला जाऊ शकतो. हे वाचा - रडणं सुद्धा आहे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या रडण्याचे फायदे पाणी शुद्ध करण्यासाठी आता प्युरिफायरसारख्या सुविधा उपलब्ध आहेत; मात्र त्यातही पाण्यातली पीएफएएससारखी रसायनं पाण्यातून वेगळी केली जातात का हे पाहिलं पाहिजे.
First published:

Tags: Health, Lifestyle, Water

पुढील बातम्या