• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुम्ही 4 तासांपेक्षा जास्त वेळ TV पाहता? मग हे अवश्य वाचा

तुम्ही 4 तासांपेक्षा जास्त वेळ TV पाहता? मग हे अवश्य वाचा

जर तुम्ही 4 तासांपेक्षा (more than 4 hours) जास्त वेळ टीव्ही बघत असाल, तर तुम्हाला घोरण्याचा त्रास सुरू होऊ शकतो, असा निष्कर्ष हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधतनातून समोर आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 जुलै : टीव्ही (Television) ही सध्या घरोघरी आढळणारी वस्तू. विशेषतः लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात तर टीव्ही हा अनेकांचा मोठा सहाराच बनला आहे. मोबाईलवर तासनतास बेवसिरीज (Webseries) पाहत बसणे, टीव्हीवर बातम्या, (TV News) मालिका (Serials) किंवा चित्रपट (movies) बघणे या गोष्टी आपण नेहमीच करत असतो. जर तुम्ही 4 तासांपेक्षा (more than 4 hours) जास्त वेळ टीव्ही बघत असाल, तर तुम्हाला घोरण्याचा त्रास सुरू होऊ शकतो, असा निष्कर्ष हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधतनातून समोर आला आहे. जे लोक 4 तास किंवा त्याहून अधिक वेळ एका जागी बसून टीव्ही किंवा मोबाईल पाहतात, त्यांच्या घोरण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता 78 टक्क्यांनी वाढते, असं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. केवळ टीव्हीच नव्हे, तर कुठल्याही कामासाठी तुम्ही सलग एकाच जागी बसून राहत असाल, तरी हे परिणाम झालेले दिसतात. मोबाईलवर तासनतास वेब सीरिज पाहणे, ऑफिसमध्ये एकाच जागेवर सलग बसून राहणे अशी कामे करणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील घोरण्याचं प्रमाण वाढत असल्याचं या संशोधनातून पुढे आलं आहे. काय आहे संशोधन हार्वर्ड विद्यापीठाकडून 10 ते 18 या वयोगटातील 1 लाख 38 हजार मुलांचं निरीक्षण करण्यात आलं. यामध्ये सतत टीव्हीसमोर बसणारी मुलं, सतत मोबाईल पाहणारी मुलं, सतत एका जागी बसून काम करणारी मुलं यांचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. त्याचप्रमाणं खेळणारी, मैदानात जाणारी, व्यायाम करणारी आणि सतत शारीरिकरित्या सक्रिय असणारी मुलं यांची निरीक्षणं नोंदवण्यात आली. त्यानुसार जी मुलं एकाच जागी बसून राहतात, त्यांच्यामध्ये घोरण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं. हे वाचा -जेवनानंतर दोन तासांनी शुगर लेव्हल किती असावी? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत कार वाढलं घोरण्याचं प्रमाण? एकाच जागी बसून राहिल्यामुळे श्वासनलिकेचा ब्लॉक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे घोरण्याचं प्रमाण वाढतं. यातून ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप ऍप्रिया नावाचा आजार बळावतो. या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत, तर ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, स्ट्रोक यासारखे गंभीर विकार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वतःच्या घोरण्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.
  Published by:desk news
  First published: