मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमचं मूलही मोबाईलशिवाय जेवत नाही का; मग हे वाचाच

तुमचं मूलही मोबाईलशिवाय जेवत नाही का; मग हे वाचाच

खाताना मुलांच्या हातात मोबाईल देणं धोक्याचं ठरू शकतं.

खाताना मुलांच्या हातात मोबाईल देणं धोक्याचं ठरू शकतं.

खाताना मुलांच्या हातात मोबाईल देणं धोक्याचं ठरू शकतं.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 23 ऑक्टोबर :  लहान मुलांचे (Children) तसे खाण्याचे नखरे असतात (Children eating habit). आता तर काय मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे ते मोबाईलशिवाय खायलाही बघत नाहीत (Children used mobile while eating). नाश्ता करताना, जेवताना त्यांना मोबाईल लागतो. त्या निमित्ताने का होईना मुलं खातील म्हणून पालकही मुलांना खाताना मोबाईल देतात. पण तुम्हाला माहिती आहे मोबाईल हातात घेऊन खाण्यामुळे मुलांवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो.

जेव्हा मुलं इतर क्रिया करताना खातात तेव्हा त्यांच्या शरीरात आहाराचं अतिसेवन अथवा अपुरे सेवन होण्याची शक्यता असते आणि यामुळे त्यांच्या पोटात गॅस होऊ शकतो (Gas problem in children).

खारघरमधील मदरहूड हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश बिराजदार यांनी सांगितलं,  जेव्हा मुलं जेवताना फिरतात आणि खेळतात किवा घाईघाईत अन्नपदार्थांचे सेवन करतात तेव्हा त्यांच्या आतड्यांसंबंधी समस्या वाढू शकतात. जर तुमचे मुल एखादी क्रिया करण्यात व्यस्त असताना अन्नाचे सेवन करतो जसे की व्हिडिओ पाहणे, व्हिडीओ गेम्स खेळणे अशा वेळी शरीराकडून येणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष होऊन आहाराचे अतिसेवन अथवा अपुरे सेवन होण्याची शक्यता असते आणि ही परिस्थिती देखील गॅसेसची समस्या होण्यास कारणीभूत ठरते.

लहान मुलांच्या पोटात गॅस होण्याची इतर कारणं 

आहारात अचानक झालेले बदल, दुधात किंवा दुधाच्या कोणत्याही पदार्थामध्ये असलेले लॅक्टोजमुळे येणा-या पोटाच्या समस्या, अन्न योग्यरित्या चावून न खाणे, जेवताना जास्त हवा गिळणे, पुरेसे पाणी न पिणे, फ्लावर, कोबी, शतावरी, ब्रोकोली यासारख्या भाज्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे. तसेच जंक फूड, मसालेदार, तेलकट पदार्थांच्या सेवनाने गॅसची समस्या होऊ शकते. मुलांमध्ये गॅसची समस्या साखरयुक्त पचायला जड असलेले पदार्थ, फळांच्या रसांमुळे उद्भवते. कार्बोनेटेड पेयांमध्ये फॉस्फोरिक एसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

लहान मुलांच्या गॅसच्या समस्येवर उपाययोजना

रोजच्या आहारातील द्रवपदार्थाचे सेवन पुरेसे आहे की नाही हे तपासा.

पुरेसं पाणी प्यायला द्या.

अन्न नीट चावून खायला लावा.

फायबर युक्त अन्न खाण्यास प्रोत्साहन द्या

आम्लयुक्त पदार्थ अति प्रमाणात सारखेचे प्रमाण असलेले पदार्थ देणं शक्यतो टाळाच.

हे वाचा - अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे? तुमच्यासाठी आहे खास डाएट प्लॅन; पोटात नाही होणार गॅस

चिप्स, नमकीन, केक, पेस्ट्री, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, पास्ता, अति गोड पदार्थ खाणं टाळावं.

शर्करायुक्त तसेच कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळावं.

अन्नाचं सेवन केल्यानंतर लगेचच झोपू देऊ नका

मुलाला व्यायामासाठी प्रोत्साहित करा आणि मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहन द्या.

ताजे शिजवलेले अन्न, सूप आणि भाज्या गॅसची समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

मुलांना गॅसची समस्या असेल तर त्यांच्या पोटाची मालिश करा, प्रोबायोटिक्स द्या.

हे वाचा - या 4 गोष्टींबद्दल गैरसमज नकोत! अ‌ॅसिडिटी आणि गॅसेसच्या समस्या असतील तर आवर्जून खा

ओटीपोटात दुखणं, पोट फुगणं, पोटात जळजळणं, शौचास अडथळे येणं ही लहान मुलांना गॅस झाल्याची काही लक्षणं आहेत. जर मुलाला अस्वस्थता जाणवत असेल तसंच ओटीपोटाचा त्रास जाणवत असल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये.

First published:

Tags: Health, Lifestyle, Parents and child