मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आयआरसीटीसीचं गोव्यासाठी टूर पॅकेज, केवळ 27 हजारांमध्ये गोव्याचं पर्यटन

आयआरसीटीसीचं गोव्यासाठी टूर पॅकेज, केवळ 27 हजारांमध्ये गोव्याचं पर्यटन

आयआरसीटीसीचं गोवा टूर पॅकेज

आयआरसीटीसीचं गोवा टूर पॅकेज

आयआरसीटीसीनं पर्यटकांसाठी गोव्याचं टूर पॅकेज लाँच केलं आहे. हे पॅकेज 4 दिवस 3 रात्रींसाठीचं आहे. यात गोव्यातील साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा असे दोन्ही भाग पाहता येतील.

गोवा (Destination Goa) हे भटकंती करणाऱ्यांचं आवडीचं ठिकाण. स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे, राहण्यासाठी बीचसाईड हॉटेल्सपासून होम स्टेपर्यंतचे अनेकविध पर्याय आणि सोबत माशाची चविष्ट कालवणं...गोव्यात येण्यासाठी पर्यटकांना हे पुरेसं असतं. खास गोवन खाद्यसंस्कृतीही दक्षिण गोव्यात अनुभवायला मिळते. तिथे अनेक चर्चही पाहण्यासारखी आहेत. उत्तर गोव्यात समुद्रकिनाऱ्यांची भटकंती, पब्जची धमाल असं बरंच काही आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा हे हॉट डेस्टिनेशन आहे. तुम्हालाही गोव्यात फिरायला जायचं असेल, तर आयआरसीटीसीनं (IRCTC) एक खास टूर पॅकेज (Goa Tour Package) आणलं आहे. गोव्यापर्यंत विमान प्रवास, फिरणं, राहणं, खाणं हे सर्व केवळ 27 हजार रुपयांमध्ये शक्य आहे. इंडिया डॉट कॉमनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. आयआरसीटीसीनं पर्यटकांसाठी गोव्याचं टूर पॅकेज लाँच केलं आहे. हे पॅकेज 4 दिवस 3 रात्रींसाठीचं आहे. यात गोव्यातील साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा असे दोन्ही भाग पाहता येतील. हा प्रवास हैदराबादमधून सुरु होईल. त्यामुळे हैदराबादमध्ये राहणाऱ्या प्रवाशांसाठी हे पॅकेज उत्तम आहे. कुणीही या पॅकेजसाठी बुकिंग करू शकतं. हैदराबाद-गोवा हा सर्व प्रवास विमानानं असेल. गोव्याच्या या टूर पॅकेजसाठी एका व्यक्तीला 27,330 रुपये भरावे लागतील. दोन व्यक्तींसाठी हे पॅकेज आणखी स्वस्त होतं. त्यात माणशी 21,455 रुपये भरावे लागतील. तीन व्यक्तींसाठी हा खर्च 20,980 रुपये इतका येईल. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून (Booking On IRCTC Website) या पॅकेजचं बुकिंग करता येऊ शकतं. हेही वाचा  - Numerology : महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तर 'ही' गोष्ट आवर्जून करा; जन्मतारखेनुसार अंकशास्त्र ही सहल 24 नोव्हेंबर 22 पासून सुरू होणार आहे. यात पर्यटकांना गोव्यापर्यंत विमानाने जाऊन परतीचा प्रवासही विमानानंच करता येणार आहे. गोव्यामध्ये थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल, तर जेवणाचीही उत्तम सोय असून ती आयआरसीटीसीच करणार आहे. या प्रवासात पर्यटकांना नाश्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध असेल. स्थानिक गोवा फिरण्यासाठी गाडीची व्यवस्था आयआरसीटीसीतर्फेच केली जाणार आहे. न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी अनेक पर्यटक गोव्यात जातात. यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे पर्यटकांचा उत्साह वाढला आहे. दोन वर्षं पर्यटन बंद असल्यामुळे टूर कंपन्याही आता पर्यटकांसाठी नवनवीन पॅकेजेस आणत आहेत. यात पर्यटकांना स्वस्त पर्याय देण्यासाठी आयआरसीटीसीनं एक उत्तम गोवा पॅकेज आणलं आहे. विमानानं गोव्यात जाऊन तिथं फिरण्याची, राहण्याची व जेवणाची सोयही केली आहे. चला तर मग लवकर निर्णय घ्या बुकिंग कधी करायचं त्याचा.
First published:

Tags: Goa, Travel

पुढील बातम्या